टाकळी ढोकेश्वर | विनोद गायकवाड,
पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री ढोकेश्वर विद्यालयातील कु.तनुश्री दत्तात्रय चौरे हिचे शास्त्रीय कलेचे A श्रेणी प्राप्त 15 गुण एस.एस.सी बोर्डाकडून ऑनलाईन निकाल लागला त्यावेळी न दिल्याने तनुश्री चौरेचा विद्यालयातील आणि तालुक्यातील प्रथम क्रमांक हुकला होता पण विद्यालयाने केलेला पत्रव्यवहार आणि वडील दत्तात्रय चौरे यांनी निकाल लागल्यानंतर सतत तीन दिवस पुण्याला जाऊन केलेला पाठपुरावा कामी आला. आणि तनुश्रीला अखेर शास्त्रीय कलेचे 15 गुण प्राप्त झाले. त्यामुळे तिची योग्यता आणि सर्वगुण संपन्नता अखेर सिद्ध झाली. तनुश्री दत्तात्रय चौरे ही विद्यालयात आणि पारनेर तालुक्यात 98.20% गुण मिळवून प्रथम आली. कु.ज्ञानदा धुमाळ व श्लोक नरवडे हे दोन विद्यार्थी द्वितीय आले. तर चि. ओंकार नरसाळे तृतीय आला.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्य बाळासाहेब खिलारी, माजी प्राचार्य सुनिल वाव्हळ, बाळासाहेब निवडुंगे, बाबासाहेब जाधव, निलम खिलारी, मल्हारी वाघसकर, सोनल रोहकले, रवींद्र ज्योतिक, रवींद्र मते, वर्षा भोंडवे, संदीप महांडुळे, नारायण शेळके, अतुल सैद, प्रसिद्ध तबला वादक स्वामी ठुबे सर यांनी मार्गदर्शन केले.
ढोकेश्वर विद्यालयात ए्लिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेचे केंद्र आहे. ढोकेश्वर विद्यालयाचे चित्रकला शिक्षक नारायण शेळके हे केंद्र चालवतात. A ग्रेड मिळालेल्या विद्यार्थ्याला 7 गुण. B ग्रेड मिळालेल्या विदयार्थ्याला 5 गुण आणि C ग्रेड मिळालेल्या विदयार्थ्याला 3 गुण मिळत असतात. त्यामुळे विदयार्थ्यांनी चित्रकला, खेळ आणि शास्त्रीय कला या क्षेत्रात आवडीनुसार सहभाग घेतला पाहिजे असे आवहान विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाळासाहेब खिलारी यांनी केले.
विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व प्रशासनाचे संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र दरे साहेब, उपाध्यक्ष मा.डॉ. विवेकजी भापकर, सचिव मा.ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा.श्री.जयंतजी वाघ साहेब, खजिनदार मा.ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम व संस्थेचे जेष्ठ विश्वस्त व माजी अध्यक्ष मा. नंदकुमारजी झावरे पा., ज्येष्ठ विश्वस्त मा. जी. डी. खानदेशे साहेब, मा.सिताराम अण्णा खिलारी सर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ भाऊसाहेब खिलारी, माजी सरपंच शिवाजीकाका खिलारी,माजी उपासभापती विलास झावरे, बापूसाहेब रांधवण, टाकळी ढोकेश्वर परिसरातील शिक्षण प्रेमी पालक, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.






