‘फोर्टीन ट्री’ एन जी ओ आणि देवकृपा फाउंडेशनचा दिशादर्शक उपक्रम
पारनेर / वासुंदे:
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका टाळण्यासाठी ‘फोर्टीन ट्री’ एनजीओ व ‘देवकृपा फाउंडेशन’च्या वतीने वासुंदे (ता. पारनेर) गावामध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ढोकेश्वर इनाम येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत वासुंदे गावात तब्बल २५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
वृक्षारोपणाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, “सध्याच्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या जागतिक तापमानाला (ग्लोबल वॉर्मिंग) आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज बनली आहे. देवकृपा फाउंडेशन आणि फोर्टीन ट्री एनजीओने घेतलेला २५ हजार वृक्षलागवडीचा हा संकल्प गावाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद व दिशादर्शक पाऊल आहे.
“या महत्त्वपूर्ण प्रसंगी वासुंदे गावच्या सरपंच विमलताई झावरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब सैद, शंकर बर्वे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, नारायण झावरे, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, पोपटराव झावरे, कैलास नऱ्हे, पी.डी.बर्वे गुरुजी, प्रसाद झावरे, किरण गायके, बापूसाहेब गायके, संग्राम झावरे, विशाल झावरे, सलीम पठाण, अंकुश बर्वे, निलेश भालके, अमर भालके, गणेश झावरे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील तरुणांनी व नागरिकांनी या लावलेल्या झाडांचे केवळ रोपण न करता त्यांचे संवर्धन करण्याचीही शपथ यावेळी घेतली.




