पारनेर/प्रतिनिधी : 
वासुंदे येथे नववर्षाच्या स्वागतात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत बाळुमामा, मुक्ताईदेवी व मळगंगा माता चषक-२०२६ ही लीग पद्धतीची स्पर्धा बोकनकवाडी फाटा येथे गुरुवार १ जानेवारी ते सोमवार ५ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.
 प्रथम येणाऱ्या ३२ संघांना प्राधान्य दिले जाईल. आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत: प्रथम बक्षीस ३१००० रुपये, द्वितीय २१०००, तृतीय ११०००, चतुर्थ ७००० व पाचवे ५००० रुपये. ट्रॉफी, बॅट, बॉल, स्टंप्स आदींचे सौजन्य विविध दानशूरांनी केले आहे.

नियमांनुसार, एक गाव एक संघ, खेळाडूंना आधारकार्ड/मतदान ओळखपत्र आवश्यक, पंचांचा निर्णय अंतिम, गैरवर्तन करणाऱ्या संघाला बाद. तसेच एक हाफ ठाकर आदिवासी खेळाडू अनिवार्य आहे. ५०% प्रवेश फी अदा न केल्यास संघ ग्राह्य धरला जाणार नाही.

 ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा उत्साहवर्धक ठरणार आहे. आशी माहिती उद्योजक दत्तात्रय साळुंके, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिरतार, उद्योजक संदीप दाते, उद्योजक बापूसाहेब गायखे, इंजि निकील दाते, युवा नेते स्वप्नील झावरे, डॉ. बाबासाहेब गांगड, संदीप खंडाळे, किरण पोपळघट, सुमित औटी, मयूर शिरतार, युवराज मदने, कुलदीप शिरतार, अनिकेत चव्हाण, दगडू शिरतार यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *