पारनेर / भगवान गायकवाड, 
 म्हसणे फाटा येथील श्री समर्थ अकॅडमीच्या प्रांगणात 79 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. ध्वजारोहण, प्रेरणादायी संदेश, विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी आणि “ऑपरेशन सिंदूर” या लघुनाटिकेने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

 प्रसिद्ध उद्योजक आणि युनिटी बिल्ड टेक प्रा. लि. चे संचालक श्री. शैलेंद्र गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा, तसेच नियमित व्यायामाने शरीर व मन बलवान ठेवण्याचा संदेश दिला. कवी सतीश वाडेकर यांनी “स्वातंत्र्याहून महान मानवता” या कवितेतून प्रेरणादायी विचार मांडले.
यावेळी महात्मा फुले मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री. शिवाजीराव बनकर, व्हा. चेअरमन श्री. केरू बबनराव गोंधळे, संचालक श्री. गोपाळराव गायकवाड, तसेच प्रादेशिक मनोरुग्ण ठाणे येथील वरिष्ठ स्त्री परिचर सौ. शारदाताई अर्जुनराव मेहत्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, प्रभावी भाषणे आणि “ऑपरेशन सिंदूर” या स्वातंत्र्य लढ्यावरील लघुनाटिकेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे संचालक श्री. कैलास गाडीलकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि देशभक्ती प्रत्येक श्वासाचा भाग असावी, असा संदेश दिला.

 सौ. शिल्पा गाडीलकर, डॉ. अरुणा भाबंरे, श्री. दिगंबर देसले आणि सौ. माधुरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. श्री. शशिकांत रासकर, श्री. सोमनाथ खोबरे आणि सौ. स्वाती मेहेत्रे यांचे मोलाचे योगदान लाभले.

 सौ. स्मिता ठुबे, कु. श्रेया रासकर आणि कु. लावण्या आगलावे यांनी सूत्रसंचालन यशस्वीरीत्या केले, तर सौ. वंदना दिघे यांनी आभार प्रदर्शन केले.

हा स्वातंत्र्य दिन सोहळा उपस्थित सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *