पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सावरगाव काळेवाडी येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठात गुरुपौर्णिमेनिमित्त 10 जुलै 2025 रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य सुनिता अनंत पोद्दार काकी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होणार असून, मठाचे व्यवस्थापक संतोष गायखे यांनी याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकडा आरतीने होईल. यानंतर होम हवन, प्रवचन आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 7 वाजता ह.भ.प. रेवनाथ महाराज चिकणे यांचे प्रवचन होणार आहे. काळेवाडी येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठाची स्थापना होऊन दर मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाआरती होत असते. गुरुपौर्णिमेनिमित्तही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला मठाचे व्यवस्थापक उद्योजक संतोष गायखे, गणेश गायखे, राजेंद्र जगताप, रामदास मगर, सुदर्शन भोसले, ऋषिकेश गायखे, रवींद्र गायखे, लक्ष्मण गायखे, मुकुंद कळमकर, नवनाथ राळे, दत्तात्रय भोसले आणि गणेश भोसले यांनी संयुक्तपणे माहिती दिली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सोहळ्यामुळे काळेवाडी परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना अध्यात्मिक अनुभवाची संधी मिळणार आहे.




