पारनेर / प्रतिनिधी, 
श्रावण सोमवाराच्या अत्यंत पवित्र आणि भक्तिमय वातावरणात सारोळा अडवाई ते प्रसिद्ध कवडेश्वर मंदिर या रस्त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यामुळे कवडेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांचा आणि स्थानिकांचा प्रवास आता अधिक सुखकर व सुरक्षित होणार आहे.

रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्या अगोदर श्रावणी सोमवाराचे औचित्य साधून सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते कवडेश्वर मंदिरात श्रीं महादेवीची महापूजा करण्यात आली. 

कवडेश्वर मंदिर हे परिसरातील श्रद्धाळूंचे मोठे श्रद्धास्थान आहे. यापूर्वी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने विशेषत श्रावण महिन्यात भाविकांना व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या नवीन रस्त्यामुळे भाविकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

या कार्यक्रमाला जामगाव सरपंच बाळासाहेब माळी सारोळा आडवाई, शहांजापूर संगीता ताई मोटे, हिवरे बाजार, पिंपळगाव कौडा गावचे सरपंच, कामरगाव सरपंच संदीप ढवळे, उपसरपंच, अण्णा मोटे, परसराम फंड, देविदास आबुज, शंकर महांडुळे, मल्हारी जासूद, प्रशांत साठे, लक्ष्मण ठोकळ, योगेश ठोकळ, उत्तम बेंद्रे, जयसिंग गुंजाळ, डॉ वैभव शिंदे, साहेबराव नरसाळे, आकाश येवले, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांची उत्तम सोय झाल्याबद्दल उपस्थितांनी आणि ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. लोकार्पणानंतर मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *