मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान
चोंभुत / स्वप्निल भालेराव,
चोंभुत गावचे तरुण तडफदार सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे युवा नेते नितीन घोलप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक तालुका अध्यक्षपदी नुकतीच मुबंई ठिकाणी एका झालेल्या कार्यक्रमात वाय. बी सेंटर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पदाचे नियुक्तीपत्र युवा नेते नितीन घोलप यास प्रदान करण्यात आले. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी करण्याचे हेतूने मा. अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार काम करत आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील ओबीसी घटकातील समस्या, युवकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न,सामाजिक सलोखा, या बाबींचा विचार करता नव्या दमाच्या तरुणांकडे नेतृत्व देत आहेत . जेणेकरून पक्ष बळकटीसाठी व सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल. सदर निवडीबद्दल आमदार -काशिनाथ दाते सर, गंगाधर शेळके (माजी कृ. उ. बा. समिती उपसभापती ) मधुकर उचाळे(मा. जि. प. सभापती ),जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रम सिंह कळमकर, तालुका युवक अध्यक्ष भास्कर उचाळे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सुदामती कवाद, जिल्हा उपाध्यक्ष आर. एस.कापसे, युवती तालुकाध्यक्ष सुषमा रावडे,सुनील शेळके(मे.शेळके ग्रुप ऑफ कंपनीज ) ,जेष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्के(मुंबई ),चेअरमन दत्ता कोल्हे, खंडू म्हस्के,सुरेश दरेकर, संतोष वाघुले, बबन कोल्हे, रावसाहेब माळी, रावजी सोमवंशी,खंडू मेहेर (जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष -सावता परिषद )रमेश माळी, संदेश म्हस्के पाटिल , प्रवीण उचाळे, विक्रम पारखे, महेंद्र म्हस्के, विक्रम सोमवंशी, भाऊ मेहेर, बाळासाहेब मेहेर,ग्रामपंचायत सदस्य योगेश बरकडे,ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव, दत्तात्रय गाडेकर आदी मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




