कासारे (पारनेर)/ प्रतिनिधी,
 महाराष्ट्र शासनाच्या सन २०२५-२६ जनसुविधा योजनेअंतर्गत मौजे कासारे येथे घनवट वस्ती ते निमसे वस्ती जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आज सकाळी भूमिपूजन संपन्न झाले. या रस्त्यासाठी १० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. या कामाचे कॉन्ट्रॅक्टर अरिहंत कन्स्ट्रक्शनचे आनंद गांधी आहेत. 

 यावेळी सरपंच, उपसरपंच, महायुतीचे सर्व पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, सदस्य तसेच ग्रामपंचायत कासारे यांचा समावेश होता.  

मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, जलसंधान (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहमदनगर जिल्हा), मा. आ. काशिनाथ दाते यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याचे काम होत असून आमदार काशिनाथ दाते सर यांचे सुपुत्र डॉ.प्रदीप दाते यांची या भूमिपूजन समारंभासाठी विशेष उपस्थिती लाभली.

सकाळी ठीक १०:०० वाजता झालेल्या या समारंभाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  
🔶🔶🔶🔶🔶
“आमच्या निमसे व घनवट वस्तीतील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक गेली अनेक वर्षे खराब रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करत होते. पावसाळ्यात तर चालणेही अवघड झाले होते. हा रस्ता आमच्यासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आणि मा. आ. काशिनाथ दाते साहेबांनी आमच्या गावाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. डॉ.प्रदीप दाते यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. या सर्वांचे मी आणि गावकरी मनापासून आभारी आहोत. कॉन्ट्रॅक्टर आनंद गांधी यांना मी विनंती करतो की, हा रस्ता उत्तम दर्जाचा व वेळेत पूर्ण करावा, म्हणजे गावकऱ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतील.” 

 शिवाजीराव निमसे, लोकनियुक्त सरपंच, कासारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *