पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील नांदूर पठारमध्ये येथे जन्मभूमी युवा प्रतिष्ठान आयोजित स्व. अतुल राजदेव (गुरूजी) यांच्या स्मरणार्थ गाव चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.
मालिकावीरचा बहुमान शुभम आहेर, सामनावीर (अंतिम सामना) विशाल घुले, सेमी फायनल १ व २चे सामनावीर प्रविण आहेर व दिनेश गं. आग्रे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिनेश गं.आग्रे, उत्कृष्ट यष्टीरक्षक रमेश घोलप, उदयोन्मुख खेळाडू औदुंबर घनदाट,उत्कृष्ट फलंदाज शुभम आहेर, सर्वोत्तम गोलंदाज कमलेश देशमाने यांना गौरविण्यात आले.
जन्मभूमी युवा प्रतिष्ठानने स्व.अतुल
राजदेव (गुरूजी) यांच्या स्मरणार्थ गाव चॅम्पियन स्पर्धा २०२६ चे १ ते ३ मे या कालावधीत यशस्वी आयोजन केले.
या स्पर्धेत दबंग बॉइज, (विशाल चौधरी,सतीश राजदेव,निलेश चौधरी), शिवगर्जना सह्याद्री फायटर्स (महेश आहेर,अशोक चौधरी,रमेश घोलप),भैरवनाथ अर्थमूवर्स वॉरियर्स (स्वप्नील द. राजदेव,कमलेश देशमाने, प्रशांत राजदेव), स्नेहल स्मृती ११(श्री. जयरामदादा चौधरी, श्री.राजेंद्रदादा चौधरी), श्री प्रतिष्ठान फायटर्स (शशिकांत आग्रे, श्रेयस आग्रे, दत्ता आग्रे), देवांश-साई-शौर्य वॉरियर्स (देवांश राजदेव, साई आहेर,शौर्य चौधरी) अशा सहा संघानी संघमालकांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभाग घेत दिमाखदार कामगिरी केली.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक स्व. सीताबाई नारायण पानसरे यांच्या स्मरणार्थ श्री. रवींद्र पानसरे (सर), दिनेश न.घोलप (उद्योजक) यांच्या वतीने २१०००₹ तर द्वितीय पारितोषिक नितीन अ. आहेर (संचालक, ट्विनोव टेक्नॉलॉजी कंपनी पुणे) १५०००₹ रोख रक्कमेची बक्षिसे होती.
या स्पर्धेत उद्योजक सागर सुंबरे यांच्यावतीने प्रथम द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघासाठी भव्य व आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या.
स्पर्धेत सामनावीर पुरस्कारकरिता बाळू चौधरी,षटकार व चौकार हॅट्रिक रंगनाथ आहेर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व यष्टीरक्षक ट्रॉफी स्वप्निल सू. राजदेव, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज ट्रॉफी जयेश आहेर व बाबू गुंजाळ,प्रथम चौकार हॅट्रिक सतीश नि. घोलप, मालिकावीर टीशर्ट व भेटवस्तू प्रशांत पानसरे, प्रविणभाई चौधरी उदयोन्मुख खेळाडू करिता स्मार्टवॉच बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
स्पर्धेच्या सोयी सुविधाकरिता सतीश नि. घोलप व गणेश ब.आग्रे यांनी नाश्ता सौजन्य व शुद्ध पाणीजार सौजन्य उद्योजक उमेशशेठ ब.घोलप यांनी केली होती.
संघमालक सहभाग सन्मानचिन्ह संग्राम दाते व शरद घोलप (रंगोत्सव सेलेब्रेशन), मेडल सौजन्य सौ.जया
सु.राजदेव (संचालिका,जन्मभूमी युवा प्रतिष्ठान), स्टँप-बॉलकरिता सुरेशशेठ बांडे व अर्जुनशेठ ठुबे
यांचे सौजन्य लाभले.
स्पर्धेच्या सामन्याकरिता पंच म्हणून नवनाथ मधे,गोरक्ष केदार,बाबाजी भांबेरे तसेच प्रसिद्ध समालोचक खंडू यांनी उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सतेश राजदेव,किरण चौधरी,प्रवीण आहेर, स्वप्निल चौधरी यांनी अथक मेहनत तसेच रवी बोंटे,शशी आग्रे,आकाश चौधरी, विशाल चौधरी,आवड्याभाई घोलप, सागर राजदेव, पोपट राजदेव यांचे विशेष सहकार्य लाभले.




