पारनेर/ प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप, या संकल्पनेतून 1 मे 2026 महाराष्ट्र दिनी हा पारनेर तालुक्यातील अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा दुसरा पारनेर भूषण पुरस्कार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पारनेर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या गुणवंतांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. डॉक्टर महाराजांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कारार्थी धन्य झाले. आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अस्मरणीय असा क्षण ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद – ह.भ.प.डॉ .नारायण महाराज जाधव.
यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून भाई कमलानंदजी- आय. ए. एस. नवी दिल्ली, तर डॉ.विद्या कावरे – नगराध्यक्ष पारनेर न.पं. या देखिल उपस्थित होत्या.
💥 गौरव मूर्ती 💥
श्री प्रदीप मारुती वाफारे.
यशस्वी उद्योगपती.
श्री चंद्रभान शेठ चिकणे.
प्रसिद्ध बैलगाडा मालक व समाजसेवक.
श्री सुदाम एकनाथ आंधळे.
उप सचिव,मंत्रालय.
सौ शिल्पा संभाजी बेलोटे.
यशस्वी उद्योजिका.
सौ मंदाकिनी द. पुजारी.
शिक्षक सुपरवायझर
श्री काशिनाथ पंढरीनाथ आंधळे.
केंद्र प्रमुख.शिक्षण,
श्री सुरेश सुकलाल अडसूळ.
समाजसेवक.
श्री धनंजय निमसे
यशस्वी उद्योजक मुंबई.
श्री रामचंद्र सुपेकर.
आदर्श शिक्षक व समाजसेवक.
सौ जयश्री मधुकर शिंदे.
महिला सक्षमीकरण.
सौ सुनीता काशिनाथ खरमाळे.
आदर्श महिला बचत गट.
श्री महेंद्र पांढरकर.
कृषी विभाग.
सौ मंगल मोहन पळसकर.
महिला सक्षमीकरण.
सौ सुनीता संतोष चौगुले.
महिला सक्षमीकरण.
श्री अभयसिंह भुसारे पाटील.
आदिवासी शिक्षण संस्था.
सौ सुनीता तुकाराम पाडळे.
महिला सक्षमीकरण.
श्री हिरामण चिकणे.
आदिवासी सक्षमीकरण.
श्री ऋषिकेश औटी
क्रीडा शिक्षण.
यांना हे पुरस्कार देण्यात आले…
अशा या गुणगौरव सोहळ्यास समाजसेवक श्री गणपत शेठ वापारे, तसेच विशेष पाहुणे म्हणून हरियाणा, बद्रीनाथ केदारनाथ येथील काही समाजसेवक देखील उपस्थित होते. साहेबराव वाफारे, संभाजी आंधळे, मोहन रोकडे, प्रदीप शेठ दरेकर, अशोक कोकाटे.दत्तात्रय कोकाटे, पांडुरंग आंधळे,बाळासाहेब कोकाटे व इतर मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे त्यांना पुरस्कार भेटलेले त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी व जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अरुण आंधळे पाटील यांनी केले तसेच आभार श्री गणपत शेठ वाफारे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश आंधळे सर यांनी अतिशय उत्कृष्ट अर्ज केले. तसेच श्री रामचंद्र सुपेकर सर यांच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
हा प्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ह. भ.प. डॉक्टर नारायण महाराज जाधव म्हणाले की,
पराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेले पारनेर. तसेच सरसेनापती बापट यांची कर्मभूमी असलेले पारनेर..तसेच आपण आज ज्या ठिकाणी बसलो आहोत या ठिकाणी संत निळोबाराय यांचे पाय लागलेले आहेत. अशा पवित्र या भूमीत हा पारनेर भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. अशा या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्यात आपली भूमिका विशेष रूपाने पारनेर तालुक्यासाठी बजावलेली आहे त्यांचा सत्कार आमचे बंधुवर्य श्री अरुण आंधळे पत्रकार यांनी ही योजना केली. याच्यामध्ये या त्यांच्या सर्व सहकार्यांनी जी ही योजना आखली व हा जो सत्कार घडून आणला या सर्वांचे मनापासून आभार. या तालुक्यामध्ये सर्वात शेवटचं संतरत्न झाले त्या निळोबारायांचं असं वाग्मय झालेलं आहे ते सर्व विश्वात अवस्मरणीय असे वाड्मय आहे.
आणि या भूमीमध्ये अशा प्रकारची नररत्त किंवा नारीरत्न जन्म घेतात. आणि समाजासाठी काहीतरी करतात.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नारीरत्न आणि नरत्नांचा हा सोहळा आयोजित केला ते आमचे बंधुवर्य अरुण आंधळे यांनी गागर मे सागर अशा पद्धतीने घागरीमध्ये सागर भरावा अशा पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये हा सोहळा आयोजित केला आहे. या ठिकाणी आमचा अधिकार नसताना कौतुक केले जात आहे.
सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात व आदिवासी क्षेत्रात हे जे लोक काम करतात यांना हा पुरस्कार देऊन एक प्रकारे त्यांना ऊर्जा देण्याचे काम या आयोजकांनी केले आहे. आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी बोलावले परंतु आमची ती पात्रता नाही. ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या वतीने मी आपणास आपल्या कामात अधिक प्रेरणा मिळो अशी विनंती करतो. आपण सर्वजण सुखी आणि सर्वांना निरोगी आयुष्य मिळो. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलात आज जो प्रत्येकाला मिळालेला पुरस्कार आहे तो पुरस्कार नसून हा आपल्या कार्याची पावती आहे. एका महापुरुषाची स्तुती करताना शास्त्रामध्ये ऋषींनी असे सांगितलेले आहे की, आज ज्यांचा सत्कार झालाय त्यांचं कुळ बऱ्याच जणांना आपल्या सत्कार आपले आई-वडील आपले पतीदेवता आपल्याबरोबर असावी असं प्रत्येक जणाला असं वाटतं हीच खरी आपली भारतीय संस्कृतीत आहे.या संपूर्ण कुळांना आपण पवित्र केल आहे.या पुरस्काराने आईची कुशी धन्य झालेली आहे.वसुंधरा पुण्यवती हे कार्य केवळ तालुक्यापुरतं मर्यादित नसून वसुंधरा म्हणजे संपूर्ण पृथ्वीमध्ये अशा प्रकारचे आदर्श मानव निर्माण व्हावेत. आणि ज्यांनी अशा प्रकारच्या सदाचाराचा सदभावण्याचा आदर्श प्रस्थापित करावा म्हणून असे जे पुरुष किंवा स्त्री आहेत अशा प्रकारचे दीर्घायुष्य आरोग्य आपल्याला प्राप्त व्हावं अशा कार्यासाठी आपल्याला आम्ही खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यापेक्षा या ठिकाणी आमचे पितृतुल्य असणारे कमलानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हिमालयाच्या व कुरुक्षेत्राच्या कुशीत ज्यांनी आपलं जीवन अर्पित केलं. गाईंच्या संरक्षणासाठी आपलं गो सौरक्षण चे काम हे करतात या वयामध्ये हे महान विभक्ती आहेत. ते आज आपल्या या पावन वायु मंडळात उपस्थित राहिले त्याचा सर्वात परमानंद व खऱ्या अर्थाने शांती देणारे अशा प्रकारचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा आपणासाठी प्रार्थना करतो आपापल्या परीने आपल्या जवळ असणारे जे काही मनोबल आहे शारीरिक बल मनोबल आत्मबल या सगळ्या बलांचा उपयोग करून आपला भारत देश खरा विश्वगुरू व जगद्गुरु चे बल प्राप्त होवो.पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा..या शुभ चिंतनाने मी विराम देत आहे.




