पारनेर | ता. प्रतिनिधी,   
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त पारनेर तालुक्यात समाजोपयोगी उपक्रमांची प्रेरणादायी मालिका राबविण्यात आली. सेवा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांद्वारे स्व. अजितदादा पवार यांच्या सेवाभावी विचारांना अभिवादन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आमदार काशिनाथ दाते जनसंपर्क कार्यालय, पारनेर येथे जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात १६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी आमदार काशिनाथ दाते यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत, समाजहितासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम म्हणजे स्व. अजितदादा पवार यांच्या सेवाभावी विचारांना वाहिलेली खरी आदरांजली असल्याचे सांगितले.

जयंती सप्ताहानिमित्त श्रृंग ऋषी गड, भाळवणी येथे वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच पारनेर शहरातील वरची वेस परिसरातही वृक्षलागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

याच दिवशी पारनेर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (पंचायत समिती), महात्मा ज्योतिबा फुले पुतळा (पारनेर वेस), सेनापती बापट स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (बाजारतळ) या परिसरात स्वच्छता करून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी ठेवण्याचा संदेश देण्यात आला. समाजहिताचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्याचा संकल्प या अभियानातून व्यक्त करण्यात आला.

या सर्व उपक्रमांप्रसंगी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. काशिनाथ दाते, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतदादा गायकवाड, जिल्हा परिषद माजी सदस्य वसंतराव (वसंत) चेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष आर. एस. कापसे, उद्योजक दिलीप दाते, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, डॉ. प्रदीप दाते, पारनेर शहराध्यक्ष राजू औटी, उपशहराध्यक्ष सुनिल गाडगे, नगरसेवक अशोक चेडे, नगरसेवक युवराज पठारे, कांतीलाल ठाणगे, शहराध्यक्षा कविता औटी, बाळासाहेब लामखडे, देवरामशेठ मगर, पंढरीनाथ उंडे, दत्ताशेठ कुलट, विठ्ठल कवाद, मंगेश दाते, अशोक कावरे, विकास पवार, संदीप रोहोकले, सोमनाथ वरखडे, सचिन दाते, रोहिदास लामखडे, शिवराज कदम, सुभाष सासवडे, रेश्मा गलांडे, संदीप सालके, रमेश वरखडे, इंद्रभान गाडेकर, अरुण राजदेव, अक्षय गोरडे, स्वप्निल ठुबे, ज्ञानेश्वर औटी, संतोष आवारी, किरण रासकर, बाळासाहेब फटांगरे, सुभाष दुधाडे, आर.पी.आय. तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, सोनल कुलथे, निलम गोसावी, पिनू रोहोकले, दीपक पवार, राजू मुगदे, विकास रोहोकले, सुमित रोहोकले, पवन रोहोकले, महेश रोहोकले, नवनाथ रोहोकले, नागेश रोहोकले, हनुमंत नाबगे, सोनू कपाळे, योगेश शिंदे, राजू जाधव, बापू खरमाळे, जयेश खरमाळे, राहुल खरमाळे, माऊली उकांडे, तेजस खरमाळे, वनरक्षक भीमराव दवने, वनसेवक किशोर गुंजाळ यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आनंदऋषीजी ब्लड सेंटरचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुनील महानोर, रेखा साळवे, मधुरा जोशी, आकाश बोडके तसेच ब्लड सेंटरच्या संपूर्ण वैद्यकीय व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

रक्तदानातून मानवतेची सेवा, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानातून सामाजिक जबाबदारीची जाणीव या तिन्ही मूल्यांचा प्रभावी संगम या उपक्रमांतून अनुभवायला मिळाला. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाला औपचारिकतेपलीकडे जाऊन लोकहिताचे स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पारनेर तालुक्यात हा जयंती सप्ताह समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभागाचा प्रेरणादायी आदर्श ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *