पारनेर / ता. प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पारनेर तालुका अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी वसंत चेडे यांची निवड करण्यात आली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष धनंजय निमसे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप रोहोकले, सुभाष लोंढे, कार्याध्यक्ष पंढरीनाथ उंडे, युवकचे तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, हरिषकाका दावभट, जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, सुनिता सोबले, कविता औटी, सोनाली कुलथे, जयश्री शिंदे, रेश्मा गलांडे, नीलम गोसावी, देवराम मगर, सुभाष ठाणगे, अनिल देठे यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार दाते सर यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक गती देण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गावागावांत पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे, बूथस्तरावर कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे निर्माण करणे, पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटनेत सक्रिय संधी देणे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, जनसंपर्क वाढवावा आणि पक्षाला गावपातळीवर अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही आमदार दाते सर यांनी यावेळी केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “वसंत चेडे यांच्यासारख्या अनुभवी आणि संघटनात्मक कामाची जाण असलेल्या नेतृत्वाकडे पारनेर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा निश्चितच आनंद आहे. आमदार काशिनाथ दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक मजबूत आणि गतिमान होईल, असा मला विश्वास आहे. सर्व जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी करावे. आगामी काळात पक्षाला अधिक बळकटी देत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम करावे, अशा शुभेच्छा देतो.”
– जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत

🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून तालुकाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, आ. काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमदार दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. गावागावांत पक्षाची फळी सक्षम करणे, युवकांना संघटनेत संधी देणे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचे माझे प्राधान्य राहील. सर्वांना सोबत घेऊन पक्षाला तालुक्यात अधिक बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
– नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वसंत चेडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *