अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित विशेष बोधचिन्हाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. मंत्री परिषदेच्या बैठकीच्या पूर्वी या विशेष बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याची माहिती सर्वांना व्हावी, त्यांच्या शिकवणीचा नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हाचा वापर विविध शासकीय कार्यक्रमांत आणि शासकीय पत्रव्यवहारात केला जाईल. यावेळी भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपालाचे अनावरण करण्यात आले.
००००




