कासारे / प्रतिनिधी, 

कासारे येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आणि रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून रेशन कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पचे उद्घाटन लोकनेते खासदार निलेश लंके यांचे ज्येष्ठ बंधू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक अण्णा लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

या कॅम्पमध्ये गावातील नागरिकांना रेशन कार्ड नोंदणी, दुरुस्ती आणि नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दीपक अण्णा लंके यांनी यावेळी बोलताना गावातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, अशा उपक्रमांमुळे गावकऱ्यांना प्रशासकीय सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी कासारे गावचे सरपंच शिवाजीराव निमसे, सोसायटीचे चेअरमन तुळशीराम लगड, बंशीशेठ खरात, वसंतराव दातीर, आप्पाजी लगड, मिनिनाथशेठ पानमंद, पप्पूशेठ कासुटे, भगवान साळवे, भाऊ शिवाजी खरात, सखाराम नरड, पोपट नरड, जितेंद्र नरड, माजी सरपंच भानुदास आग्रे, रवी घोलप, भाऊसाहेब चौधरी, अमोल गाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, गावातील महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या कॅम्पमुळे अनेक गावकऱ्यांना रेशन कार्डाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याची संधी मिळाली. निलेश लंके प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *