कासारे / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील छोट्याशा कासारे गावातली एक कणखर आणि तडफदार नेतृत्वाचा, शिवसेना वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि शिवसेना टाकळी गटाचे गटप्रमुख धनंजय शेठ निमसे यांचा आज वाढदिवस. कमी वयात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात नावलौकिक कमावणाऱ्या आणि समाजकारणाची प्रचंड आवड असलेल्या धनंजय शेठ यांनी आपल्या कासारे गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव आज गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी शुभेच्छांच्या वर्षावातून केला.
धनंजय शेठ निमसे यांनी कोणतेही मोठे पद नसताना कासारे गावाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले. विशेषतः गावातील बिरोबा मंदिर परिसराच्या सुशोभीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या परिसराच्या विकासासाठी गावातील प्रत्येक गोरगरिबांचा सहभाग मिळवण्यात त्यांनी यश मिळवले. समाजकारणाची आवड आणि गावाच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते गावकऱ्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवू शकले. “एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णच करायचे,” ही त्यांची जिद्द आणि दृढनिश्चय त्यांना इतरांपासून वेगळे ठरवतो.
शिवसेना वाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून धनंजय शेठ यांनी वाहतूक क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे, शिवसेना टाकळी गटाचे गटप्रमुख म्हणून त्यांनी पक्षाच्या कार्याला गती दिली. कमी वयात त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवला असून, त्यांचे नेतृत्व आणि कार्यक्षमता यामुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत. गावातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गावाच्या हितासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणाऱ्या धनंजय शेठ यांचे कार्य केवळ कासारेपुरतेच मर्यादित नसून, परिसरातील इतर गावांनाही त्याचा लाभ होत आहे.
आजच्या वाढदिवसानिमित्त विवीध क्षेत्रातील स्तरावरून धनंजय शेठ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभकामना मिळत आहेत. धनंजय शेठ निमसे यांनीही सर्वांचे आभार मानले आणि गावाच्या विकासासाठी अधिक मेहनत घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कासारे गावाच्या चेहऱ्यामोहऱ्यात बदल घडवणाऱ्या या तरुण नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! त्यांचे कार्य असेच बहरत राहो आणि गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळो, हीच अपेक्षा.
शिवसेना टाकळी गटाचे गटप्रमुख धनंजय शेठ निमसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शुभेच्छुक:
प्रदीपशेठ वाफारे, दिगंबरशेठ नवले, अजितशेठ निमसे, रवीशेठ नवले, केतनशेठ निमसे, गीतारामशेठ खरात, मा. चौधरी, संदीप कोकाटे, ईश्वरशेठ खरात, मंगेशशेठ दाते, एकनाथशेठ चौधरी, सदानंदशेठ नवले, प्रकाशशेठ नवले, भिमराज खोसे विश्वासशेठ खरात, गौरव आणि संतोष जाधव.
नाथाजी अँड सन्स के बी रोडलाईन्स बिरोबा ट्रान्सपोर्ट आणि धनंजयशेठ निमसे मित्र परिवार.
पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत धनंजय शेठ निमसे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. एक नवा निष्कलंक चेहरा असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. धनंजय शेठ यांनी गावविकासाचा संकल्प पुन्हा व्यक्त केला. त्यांना वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा!










