मुंबई महापालिकेत भाजप सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल पारनेरमध्ये उत्साहाचे वातावरण

पारनेर (प्रतिनिधी):
पारनेर तालुक्याचा अभिमान आणि बाभुळवाडे गावचे सुपुत्र श्री. गणेश दादा खणकर यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) भाजप सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल, त्यांच्या गौरवार्थ शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी बाभुळवाडे येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षपद पारनेर-नगर मतदार संघाचे आमदार श्री. काशिनाथ दाते सर भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. सुजयदादा विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच, भाजपचे राज्य परिषद सदस्य मा. श्री. विश्वनाथ दादा कोरडे आणि अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपजी भालसिंग, जिल्हा सरचिटणीस सुभाषराव दुधाडे, जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात,मंडल अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, किसनराव शिंदे, शिवाजी काका खिलारी, सचिन वराळ पाटील व पंकज कारखिले यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६
वेळ: सकाळी ९:३० वाजता
स्थळ: माता मळगंगा सभागृह, बाभुळवाडे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर.

बाभुळवाडे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांचे अध्यक्ष व संचालक, श्री केदारेश्वर सेवाभावी ट्रस्ट व पतसंस्थेचे पदाधिकारी तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गणेश दादा खणकर यांनी मुंबईच्या राजकारणात मिळवलेल्या या मोठ्या यशामुळे संपूर्ण पारनेर तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सत्कार सोहळ्यास परिसरातील सर्व नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाभुळवाडे ग्रामस्थ आणि स्वागतोत्सुक कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *