निघोजमध्ये भव्य किर्तन महोत्सवाचे दि. १८ डिसेंबर पासून उत्साहात आयोजन


निघोज [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – 
पारनेर तालुक्यातील दुध उत्पादकां चे कैवारी म्हणून प्रसिद्ध असलेले, हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन देणारे कन्हैय्या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निघोज गुरुवार दि. १८ डिसेंबर ते गुरुवार दि. २५ डिसेंबर या कालखंडात तालुक्यात अखंड ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी राज्यातील नामवंत किर्तनकारांचे ही किर्तनांचा भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कन्हैया परिवाराचे संचालक , महानगर बँकेचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक बबनराव लंके यांनी दिली आहे.

     पारनेर तालुक्यात प्रथम दुध उत्पादकांचे व निघोज परिसरात मामा म्हणून प्रसिद्ध असलेले शांताराम भाऊ लंके हे साधे व सालस व्यक्ती महत्व होय. कोठे ही धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक कार्यक्रम असला की, शांताराम मामा लंके हे तेथे तन, मन, धनाने उपस्थित राहत असत. त्यांनी तालुक्यातील अनेक अखंड हरिनाम सप्ताहांना योगदान दिले. सप्ताह म्हटला की, त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले जात असे. आध्यामिक व धार्मिक क्षेत्रातील दिग्गज विचारवंत किर्तनकार महाराजांशी त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते.

     दिवंगत शांताराम मामांनी स्थापन केलेल्या लंके [ कन्हैया ] परिवाराच्या कन्हैय्या दुध उद्योग, दुध पावडर प्रक्रिया उद्योग, शुद्ध पाणी उदयोग, पेट्रोल पंप, कन्हैय्या मल्टीस्टेट पतसंस्था या व इतर व्यवसायात निघोज परिसरात हजारो लोकांना पोटासाठी रोजगार देऊन त्यांच्या चुली पेटविल्या. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून अखंड पणे सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानदान यज्ञात आज अखेर पारनेर, शिरूर, जुन्नर व नगर तालुक्यातील लाखो भाविक भक्तांनी सहभाग घेतला आहे. या सप्ताहात राज्यातील दिग्गज किर्तनकारांनी आपले हरिकिर्तन सादर करत, परिसर मंत्र मुग्ध केला आहे.
     दिवंगत शांताराम मामांच्या गत वर्षी डिसेंबर मध्ये अचानक निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने भव्य किर्तन महोत्सवात दररोज रात्री ६.३० ते ८.३० वाजता गुरुवार दि. १८ रोजी पहिल्या पुष्पाची किर्तन सेवा मुंबई येथील हभप जगन्नाथ महाराज पाटील, शुक्रवार दि. १९ रोजीचे दुसरे पुष्पातील किर्तन सेवा प्रसिद्ध समाजप्रबोधन, किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, शनिवार दि. २० रोजीचे तिसरे पुष्पातील किर्तनसेवा नाशिक येथील किर्तन महर्षी हभप संजय महाराज धोंडगे, रविवार दि. २१ रोजीचे चौथ्या पुष्पातील किर्तनसेवा श्री क्षेत्र देवीच्या आळंदी येथील संतसेवक हभप ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली, सोमवार दि.२२ रोजीच्या पंचम पुष्पातील किर्तनसेवा केज येथील भावरत्न हभप समाधान महाराज शर्मा,  मंगळवार दि.२३ रोजी सहाव्या पुष्पातील किर्तनसेवा जळगाव येथील हिंदू धर्म प्रचारक हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, बुधवार दि.२४ रोजी सातव्या पुष्पातील किर्तनसेवा जळगाव येथील पिंगळा फेम हभप विशाल महाराज खोले, तर दिवंगत शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने गुरुवार दि.२५ रोजी बीड येथील प्रसिद्ध किर्तन केसरी हभप अक्रुर महाराज साखरे यांचे हरिकिर्तन सेवा सकाळी १० ते १२ वाजता आयोजीत करण्यात आले असून तदनंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे. 
या किर्तन महोत्सवात गायनाचार्य हभप अभिमान ढाकणे, मयूर म्हस्के, नामदेव तळेकर, गणेश शेंडे, मृदुंगशार्य हभप समाधान कन्हेरकर, मृदुंगसाधक हभप ऋषिकेश सुक्रे व संवादिनी वादक हभप कैलास महाराज सुक्रे व श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी टाळकरी म्हणून साथ संगत देणार आहेत. 

       तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी या ज्ञान यज्ञात सहभागी होत, महाप्रसादाचाही लाभ घेण्याचे आवाहन कन्हैय्या परिवाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र लंके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *