पारनेर / भगवान गायकवाड, 
पारनेर शहरातील लकी मिसळ हाऊस मध्ये आज, दि. १६ रोजी, ‘चहा दिन’ मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी लकी मिसळ हाऊसचे संचालक रमीज राजे, सलीम राजे, भगवान गायकवाड,साहिल शेख, रशीद शेख,आफताब राजे,आदी उपस्थित होते.

एकमेकांचे स्नेह संबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने हा अनोखा दिवस साजरा करण्यात आहे . लकी हॉटेल ग्रामस्थांना अल्पोपाहार पुरवणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, आणि याच ठिकाणी हा ‘चहा दिन’ सर्वांना एकत्र आणणारा ठरला.

यावेळी शहरातील नागरिक चहाचा स्वाद घेत असतात.चहाच्या कपाने एकमेकांना शुभेच्छा देत, मनमोकळ्या गप्पा मारत आणि सुख-दुःखाची देवाणघेवाण करत हा दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमधील एकोपा आणि जिव्हाळा वाढण्यास मदत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या आगळ्यावेगळ्या ‘चहा दिना’च्या माध्यमातून लकी मिसळ हाऊसने केवळ चहाचा व्यवसाय न करता, सामाजिक आणि भावनिक ऋणानुबंध जपण्याचा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *