पारनेर / भगवान गायकवाड, 
         शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एसओएफ व आय एम ओ मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिंपियाड व मॅथ इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेमध्ये गुरुदेवचे सीबीएसई स्कुलचे २५ विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट आले आहेत. इयत्ता तिसरी मधील अंश पाल दुसऱ्या फेरीसाठी पात्र, इयत्ता दुसरीतील कस्तुरी निपुंगे ला आंतरराष्ट्रीय कांस्य पदक व १००० रुपयांचे बक्षीस.यावर्षी ११ व १२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सायन्स व मॅथ इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेचा निकल नुकताच प्रसिद्ध झाला. या निकालामध्ये गुरुदेव सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत गुरुदेव शिक्षण संस्थेच्या नावलौकिकास साजेशी अशी कामगिरी केली आहे. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे गुरुदेव सीबीएसई स्कूलने पहिल्याच वर्षी मॅथ आणि सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत २५ गोल्ड मेडल मिळवत सुपा आणि परिसरात आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे संस्थेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत जिद्द शिक्षकांचे अथक परिश्रम याचाच परिपाक म्हणून विद्यार्थी यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करताना दिसून येत आहेत. 

          नॅशनल सायन्स ऑलिंपियाड या परीक्षेमध्ये इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी इयत्ता पहिलीतील अथर्व निलेश बागल, अथर्व अजित पवार, रिषभ विशाल ढवळे, अन्वी अरुण वाळुंज व आरवी गोकुळ थोरात यांना सुवर्णपदक.

         इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कस्तुरी प्रीतम निपुंगे हिने उत्कृष्ट कामगिरी करत डिस्टिंक्शनसह सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय कांस्यपदक तसेच १००० रुपयांचे पारितोषिक मिळवले. तसेच ईश्वरी कल्याण लगड, प्रखर दीपक सिंग, सर्वज्ञा विकास औटी व अक्षरा पुरोहित यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.

          इयत्ता तिसरीतील अंश संतोषकुमार पाल याने सुवर्णपदकासह दुसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळवली. याच इयत्तेतील आरोही सुभाष पोटघन, राजवीर मदन गवळी व अनुष्का राजेंद्र मगर, मॅथ इंटरनॅशनल ओलंपियाड मधील गोल्डन कामगिरी करणारे विद्यार्थी – इयत्ता पहिली- अथर्व अजित पवार, रिषभ विशाल ढवळे, अन्वी अरुण वाळुंज 
 इयत्ता दुसरी- कस्तुरी प्रीतम निपुंगे, सर्वज्ञ विकास औटी, अक्षरा पुरोहित, सर्फराज समीर शेख, इयत्ता तिसरी- 
अंश संतोषकुमार पाल, अनुष्का राजेंद्र मगर, अर्णव संदीप पवार, कार्तिक नानासाहेब येणारे आदींचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नीलम जाधव मॅडम, अमृता राठोड मॅडम, आयेशा मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
         विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर सर, संस्थापक सुभाष मगर, संचालिका शोभा शिर्के मॅडम, मधुकर शिर्के सर, शंकर दोरगे सर, मंगल दोरगे मॅडम, प्राचार्य कदम सर, पर्यवेक्षक चितळकर सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

🔶🔶🔶🔶🔶
 गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूलचा ही दबदबा कायम
        चालू वर्षी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सायन्स व मॅथ इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेमध्ये गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूलचे ६ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व ११ विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र. 

नॅशनल सायन्स ऑलिपियाडचे गोल्ड मेडल विद्यार्थी- 
आदित्य पंकज विश्वकर्मा, देवयानी संदीप दिवटे, वैष्णवी गोपीनाथ खोले.

 मॅथ इंटरनॅशनल ओलंपियाड मधील गोल्ड मेडल मिळवणारे विद्यार्थी- आदित्य पंकज विश्वकर्मा, गौरव मंगेश गवळी, समीक्षा संतोष नवले, साक्षी राजेश शेळके, स्वराज गोकुळ कळमकर, साई दत्तात्रय डोईफोडे, अलिजा जावेद शेख, वैष्णवी गोपीनाथ खोले, देवेश पोपट शिंदे, राशी शैलंद्रशिंग चौहान, स्वीकार रमेश येणारे या विद्यार्थ्यांची सेकंड लेवल साठी निवड झाली आहे. यामुळे गुरूदेव सेमी इंग्लिश स्कूलचा दबदबा कायम आहे. या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी प्राचार्य कदम सर, प्रा. दाते सर यांनी मार्गदर्शन केले तर विज्ञान विषयासाठी प्रा. कदम सर, प्रा. चौधरी सर, प्रा. साठे सर, देशमुख मॅडम, शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *