अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 
अहिल्यानगर येथील स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रदर्शनामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा निंबळक, आर्मी स्कूल, साई इंग्लिश मेडियम स्कूल, हनुमान विद्यालय – टाकळी खातगाव, रेसिडेन्शियल स्कूल केडगाव, बोल्हेगाव तसेच इतर शाळांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे विद्यार्थी आपले विज्ञान प्रकल्प सादर करणार असून त्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक मा. दिपक कुलकर्णी असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. विजय भास्कर कांडके (डायरेक्टर, कांडके केमिस्ट्री अकॅडमी) आणि मा. तस्नीम सैफी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास स्नेहालय संस्थेच्या डॉ. प्रीती भोम्बे (सचिव), श्री. हनीफ शेख (संचालक), सौ. कांचन पापडेजा (मानद संचालक, SEMS) तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीतल गुंदेचा यांची उपस्थिती लाभणार आहे.

हा विज्ञान मेळावा एफ-ब्लॉक, सर्व्हे नं. २३९, श्री टाइल्स चौक, MIDC, अहिल्यानगर येथे संपन्न होणार असून पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *