पारनेर / भगवान गायकवाड, 
         पारनेर तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय रूईछत्रपती येथे कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून राखी संकलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल विजय दिनानिमित्त शहीद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर श्री राजू मेहेत्रे यांनी “कारगिल विजय दिनाचे महत्त्व” व “एक धागा सैनिकांसाठी” उपक्रमाबाबत प्रस्तावना सादर केली. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी लिहिलेले पत्र व राखी संकलन भेट पेटीत टाकून सीमेवर पाठविण्याचे नियोजन केले.

          श्री ज्ञानेश्वर विद्यालय व श्री छत्रपती आजी माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत “श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा ऋणानुबंध” कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे माजी विद्यार्थी व भोयरे गांगर्डा येथील शिक्षक ह.भ. प. कालिदास भोगाडे सर यांनी व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना शालेय जीवनाच्या आठवणी सोबत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नवे तंत्र व ध्येय निश्चिती करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री भोगाडे सर यांच्या तर्फे मुलांना खाऊचे वाटप करून विद्यालयाचे मुख्याध्यापक परांडे सर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॅप्टन शिवाजी साबळे, नाना दिवटे, श्री साबळे यांनी मेहनत घेतली. सदरील कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *