जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूच्या प्रयोगाचे आयोजन

राळेगणसिद्धी येथील डीबीएम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूचे प्रयोग ( मॅजिक शो )चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. जे.डी.मापारी सरांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी डीबीएम स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राळेगणसिद्धीचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटक श्री. जे . डी. मापारी यांनी “;जादूचे प्रयोग हा विद्यार्थ्यांना मनोरंजनातून विज्ञानाकडे नेण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. जादूचे प्रयोग विज्ञान व हातचलाखीचा सुरेख संगम आहे ” असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

जादूगार श्री. प्रकाश शिरोळे यांनी आपल्या जादूच्या प्रयोगाने, हास्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, टाळ्या वाजवत कार्यक्रमाचा आनंद लुटला. पाऊस सुरु असतानाही विद्यार्थी जादूचे प्रयोग पाहत कार्यक्रमास प्रतिसाद देत होते.
कार्यक्रमाचे संयोजक चित्रपट गीतकार श्री. अरुण वाळुंज यांनी “महाराष्ट्राच्या मातीला, साऱ्या जातीपातीला, एकच अधिपती ” हे छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत सादर करत वातावरण शिवमय केले.

याप्रसंगी डीबीएम स्कूल मधील सर्व शिक्षकवर्ग, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश पावडे व सहशिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *