पारनेर / भगवान गायकवाड, 
जवळा येथील श्री. धर्मनाथ विद्यालयातील जेष्ठ कलाशिक्षक संतोष कवडे व पुणेवाडी येथील भैरवनाथ विद्यालयातील कलाशिक्षिका मिरा पुजारी(ढेरे) यांना पारनेर कलाभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पारनेर तालुका कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष कानिफनाथ गायकवाड यांनी पुरस्काराची घोषणा केली. 
    पारनेर तालुका कलाशिक्षक संघटनेच्या विविध कलात्मक उपक्रमांचे व पुरस्काराचे हे आठरावे वर्ष आहे.यासंबधांने नुकतीच पारनेर येथे तालुका संघटनेची बैठक झाली जिल्हा कलाशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय पठाडे हे अध्यक्ष स्थानी होते.या बेठकीत वरील पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली. 
संतोष कवडे हे रयत शिक्षण संस्थेतील एक जेष्ठ  कलाशिक्षक असून त्यांचे कला क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. त्यांनी  रेखाकला परीक्षेचे केंद्रचालक म्हणून  उत्तम कामगीरी केलेली आहे .तर मिरा पुजारी(ढेरे) यांनी कलात्मक उपक्रमांबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्याने कवडे व पुजारी यांचे परीसरातून अभिनंदन होत आहे.
        सदर पुरस्काराचे वितरण पुणेवाडी येथे होणार्या एका विशेष समारंभात करण्यात येणार असल्याची माहिती तालुका सचिव ज्ञानेश्वर कवडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *