पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील गणेशवाडी ( वाळवणे) येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी लहान व गरीब मुलांना जनसेवक किशोर जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्य आणि बॅग यांचे वाटप करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अण्णाभाऊ साठे यांची ओळख संपूर्ण देशात एका लोकशाहीर म्हणून आहे. विशेषतः दलित, वंचित, शोषित यांच्या मध्ये त्यांची प्रतिमा एका लोकप्रिय जनकवीची आहे. आपल्या लेखनातून त्यांनी हाशियावरील समाजाला आक्रमक भाषा दिली. जनचेतना निर्माण केली. लोकांना आपल्या हक्कांसाठी जागरूक केलं. झोपलेल्या समाजात सामाजिक क्रांतीचा अलख जागवला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन या सर्वच चळवळींमध्ये अण्णा भाऊ साठे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची विचारसंपदा आणि संघर्षशील लेखणी काळाच्या सीमा ओलांडून आजही जिवंत आहे. शोषित, पीडित,भटक्या-विमुक्त, दलित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज बनून अण्णा भाऊंनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे ही सामाजिक कृतज्ञतेची खरी अभिव्यक्ती आहे.
यानिमित्तानं समाजामधे अशा थोर व्यक्ति मत्वाची ओळख व्हावी, लहानग्यांच्या मनामधे त्यांचे विचार रुजावे या हेतूने शाळेत कार्यक्रमाचे आयोजन केले.
या प्रसंगी शालेय शिक्षक वृंद, गावकरी, आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लोकेश सूर्यवंशी अभी येणारे निलेश ठुबे कुणाल आल्हाट अभिजीत येणार रामानंद साळवे संदीप भालेकर आकाश येणारे आशिष आल्हाट यश भालेकर तुषार बोरगे अतिश सूर्यवंशी सौरभ अवचिते सचिन उमाप प्रकाश अवचिते





