पारनेर / ता. प्रतिनिधी, 

श्री संत सावता महाराज सभामंडप व श्री संगमेश्वर मंदिर सभामंडप बांधकामाचा भूमिपूजन समारंभ पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार दाते सर यांनी गोरेगाव येथे यापूर्वी करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतानाच मतदारसंघातील गावागावांत सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. गोरेश्वर देवस्थानच्या प्रस्तावित सभामंडप बांधकामास आगामी काळात ५० लक्ष तर गोरेगाव – पारनेर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठीही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत विकास हा केवळ काही भागापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक गावाच्या गरजा आणि नागरिकांच्या मागण्यांनुसार कामे मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आ. दाते म्हणाले.

विशेषतः पारनेर व कान्हूर पठार मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रश्नावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा उल्लेख करत, सन २०२५ मधील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी नुकतीच सुमारे १३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करून घेण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

“विकासकामे करताना गाव, गट किंवा व्यक्ती असा कोणताही भेद न ठेवता सर्वसामान्यांच्या गरजांना प्राधान्य देणे, हीच माझी भूमिका आहे. गोरेगावच्या विकासासाठी यापुढेही आवश्यक ती कामे मार्गी लावली जातील. शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील,” असे आमदार दाते सर यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती बाबासाहेब तांबे, मा. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, लोकनियुक्त सरपंच सौ. सुमन तांबे, माजी सरपंच राजाराम नरसाळे, मिराबाई नरसाळे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रितेश पानमंद, तंटामुक्ती अध्यक्ष पै. दादाभाऊ नरसाळे, ग्रापं सदस्य गणेश तांबे, सुरेश चौरे, बाबासाहेब चौरे, साहेबराव तांबे, भाऊसाहेब तांबे, भाऊ नरसाळे, योगेश नरसाळे, रामदास चौरे, बाबासाहेब नांगरे, ऋषीकेश नरसाळे, अनिल नरसाळे, वामन चौरे, दत्तोपंत नरसाळे, नवनाथ नरसाळे, बाळासाहेब नरसाळे मेजर, चिमभाऊ नरसाळे मेजर, भाऊ तांबे, भानुदास नरसाळे, ज्ञानदेव तांबे, बाळु नरसाळे, संतोष नरसाळे, अर्जुन चौरे, उत्तम चौरे, दत्तु चौरे, दादाभाऊ चौरे, ठेकेदार साहेबराव नरसाळे, सबाजी शेरकर, वैभव नरसाळे इ. मान्यवर उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ “गोरेगावच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी आजचा दिवस निश्चितच आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. श्री संत सावता महाराज व श्री संगमेश्वर मंदिर सभामंडपाच्या भूमिपूजनामुळे भाविकांसह ग्रामस्थांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. गोरेश्वर देवस्थानच्या प्रस्तावित सभामंडप बांधकामासाठी यापूर्वी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २० लक्ष रुपये निधी दिलेला असून आज आमदार काशिनाथ दाते सर यांनीही सबंधित कामासाठी ५० लक्ष निधी देण्याचे मान्य केले असून आवश्यक असणारा अधिकचा ५० लक्ष निधी उपलब्ध करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असून लवकरच त्या कामाचेही भुमिपूजन संपन्न होईल. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गोरेगावच्या विकासासाठी सबंधित कामे मार्गी लावल्याबद्दल व गोरेश्वर देवस्थान सभामंडपासह गोरेगाव पारनेर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासित केल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– बाबासाहेब तांबे, माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन, अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *