पारनेर / भगवान गायकवाड,
 सालाबादप्रमाणे ह. भ. प. सद्गुरू ब्रह्मलीन नाना महाराज वनकुटेकर (संस्थान सोबलेवाडी) यांच्या प्रेरणेने आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य संत महिपती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र सोबलेवाडी ते ताहाराबाद (ता. राहुरी) असा ४४ वा पायी दिंडी सोहळा उत्साहात सुरू झाला आहे. या दिंडीचे प्रस्थान आषाढ शु. शनिवार, दि. १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सोबलेवाडी येथील हनुमान मंदिर व संत कवी महिपती महाराज मंदिर येथून झाले.
दिंडी सोहळ्यात दररोज काकडा भजन, वाटचालीचे भजन, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन यांचा नित्यनियमाने समावेश आहे. दिंडी कमिटीने या सोहळ्याचे काटेकोर नियोजन केले आहे. कमिटीचे अध्यक्ष ह. भ. प. बाळकृष्ण महाराज कांबळे, उपाध्यक्ष ह. भ. प. दिनकर गव्हाणे (करंदी), सचिव ह. भ. प. बाळासाहेब सोनवणे, सहसचिव ह. भ. प. देवराम धोंडीभाऊ शेरकर (सोबलेवाडी), सल्लागार वसंत जानकु बुचुडे आणि द. मा. ठूबे (गुरुजी), दिंडी चालक रामदास महाराज क्षीरसागर (केडगाव) यांच्यासह बाळासाहेब शेरकर, धोंडीभाऊ ठाणगे, गणेश शिंदे, द्यानदेव देशमाने, सुरेश शिंदे, संजय मते, हनुमंत भागवत, वसंतराव ठूबे, किसन म्हस्के, दुर्गाजी कदम, जमन्याबापू सोबले, गोरख रोकडे, साहेबराव झावरे, नरेंद्र पोळ, गणपत सोबले, आप्पा सोबले आणि पंचक्रोशीतील वारकरी या सोहळ्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होत असून, वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेसा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *