पारनेर / भगवान गायकवाड,
   ” जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव”या गीतातून अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती पारनेर शहरात मोठ्या उत्सव आनंदात साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेल्या मंचावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस शहरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व विविध राजकीय पदाधिकारी यांनी विनम्र अभिवादन केले. 

           यावेळी प्रथमतः पारनेर नगर पंचायतचे वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नितीन अडसूळ,उपनगराध्यक्ष जायदा शेख,पारनेर तालुका खादी ग्रामोद्योगचे संचालक अमित जाधव, पाणी पुरवठा सभापती योगेश मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, आर पी आय (निकाळजे गट) किरण सोनवणे, उद्योजक राजू शेख,नगरसेवक भूषण शेलार, मधुकर नगरे, भगवान नगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव गायकवाड, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, भाऊसाहेब उमाप, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी सर, बाळासाहेब कोकाटे, ग्राहक पंचायतचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार भगवानराव गायकवाड,नवघणे साहेब, खासदार निलेश लंके मित्र मंडळाचे बाळासाहेब शेटे, सचिन नगरे, आरिफ शेख, भारतीय बौद्ध महासभेचे संपत पवार,गिरीश उमाप, सुनील जाधव, अजय उमाप, निखिल लवांडे, प्रदीप सोनवणे, उदय उमाप, सम्राट पवार, दत्ता उमाप, दत्तात्रय शिंदे, महेंद्र बोर्डे, सुनील चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *