कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे आश्वासन
पारनेर/प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) युवा नेते दीपक ठोंबरे यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (पारनेर तालुका) या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य भाजप ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष विजय हरगुडे आणि संघटनेचे संस्थापक अनुप मोरे यांनी जाहीर केली असून, निवडीचे अधिकृत पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
दीपक ठोंबरे हे पारनेर तालुक्यातील यादववाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेले मेहनती नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय असून, तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. ट्रान्सपोर्ट सेलच्या माध्यमातून माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात.
निवडीनंतर पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी ठोंबरे यांचा सन्मान करत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे तालुक्यातील कामगार विभागातील भाजपची संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
ही निवड पारनेर तालुक्यातील युवा कार्यकर्ते आणि कामगार वर्गासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
भाजपच्या माध्यमातून पक्ष संघटनेसाठी अधिक जोमाने काम करेन. ट्रान्सपोर्ट सेलमधील कामगारांच्या विविध समस्या व हक्कांसाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने प्रयत्न करेन. सर्वसामान्य कामगार बांधवांच्या कल्याणासाठी हे पद निष्ठेने वापरेन.
– दीपक ठोंबरे
(नवनिर्वाचित अध्यक्ष : भाजप ट्रान्सपोर्ट सेल व सुरक्षारक्षक कामगार युनियन, पारनेर)




