पारनेर / प्रतिनिधी : 
गीताराम जगदाळे गुरुजी हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शिक्षक म्हणून केवळ शैक्षणिक ज्ञानच दिले नाही, तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, जे आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता आणि त्यांच्या कार्याने समाजात एक सकारात्मक बदल घडवला. असे त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या वर्णनावरून लक्षात येते असे व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आणि प्राथमिक शिक्षक म्हणून आपली अमीट छाप सोडणारे स्व. गीताराम जगदाळे गुरुजी यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा वासुंदे (ता. पारनेर) येथे मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गीताराम जगदाळे यांचे एक वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे यांनी प्रवचनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि गुरुजींच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

या पुण्यस्मरण सोहळ्याला सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये आमदार काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक लंके, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, डॉ. विलास जाधव, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, शिक्षक नेते रा. या. औटी, शिक्षक नेते संतोष खामकर, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, पत्रकार शरद झावरे, शिंदोडी सरपंच एकनाथ खामकर, सरपंच विमल झावरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब गुंड, रमेश महाराज कुलकर्णी, चेअरमन नारायण झावरे, ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके, बाळासाहेब खिलारी, अंकुश पायमोडे, शरदराव पाटील, इंजि. संजय साळुंके, बापूसाहेब गायखे, पो. मा. झावरे, शंकर बर्वे, दिलीप पाटोळे, रामदास झावरे, लक्ष्मण झावरे, गजानन झावरे, अमोल उगले, स्वप्निल झावरे, पत्रकार बबनराव गायखे, महादू भालेकर, धनंजय उदावंत, पोपटराव बर्वे, सुंदरराव झावरे, एकनाथ आंधळे, गोरक्षनाथ दाते, रा. बा. झावरे, नितीन मुळे, महेंद्र दाते, सदाशिव झावरे, विकास आंधळे, संतोष दाते, संग्राम दाते, भास्कर खैरे, मारुती उगले, अमोल ठाणगे, बाळासाहेब निवडुंगे, अतुल सैद, राजाराम आंधळे, सुदाम दाते, भगवान वाळुंज, सुनील दाते, अशोक पाटोळे, सुहास गोरडे, अशोक खराबी, अशोक चेमटे, भाऊसाहेब हिंगडे, दत्तात्रय साळुंके, मेजर पांडुरंग साळुंके, गजानन जगदाळे, राजाराम जगदाळे, किसन जगदाळे, गणेश जगदाळे, बंडू जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, नवनाथ जगदाळे यांच्यासह अनेक नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
या पुण्यस्मरण सोहळ्याने गीताराम जगदाळे गुरुजींच्या समाजातील योगदानाची आठवण पुन्हा एकदा ताजी केली आणि त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


🔶🔶🔶🔶🔶

भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम

गीताराम जगदाळे गुरुजींच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला उजाळा देत हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या कार्याने प्रेरित अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. गुरुजींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

🔶🔶🔶🔶🔶🔶

जगदाळे गुरुजी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली

गीताराम जगदाळे हे हसतमुख व्यक्तिमत्व समाजामध्ये सुखात आणि दुःखात धावून जाऊन काम करणारे गुरुजींना आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले कुटुंबीयांची दुःख अतिव आहे जगदाळे गुरुजींनी त्यांच्या काळात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याची काम केले. 

सुजित झावरे पाटील (जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *