पारनेर / भगवान गायकवाड, 
  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात या वर्षी पावसाळ्यात ५० लाख रोप लावण्यात येणार आहे. त्या नुसार कमी जागेत जास्तीच जास्त रोप लावण्यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर नगर पंचायत हद्दीत असलेल्या गट क्रमांक ४१०३ या जागेमध्ये ०.७० आर क्षेत्रावर २१००० वृक्ष रोपणचा सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने मियावाकी वन विकसित करण्याचा संकल्प करून वृक्षारोपणास प्रारंभ केला असल्याची माहिती पारनेर नगर पंचायतचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी दिली. पारनेरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री निवृत्ती चव्हाण यांनी मियावाकी वनांची संकल्पना व लागवडीची कृती यावर मार्गदर्शन करून भविष्यात होणाऱ्या फायद्यांविषयी माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी विनय शिपाई, रेंज फॉरेस्ट ऑफिसर निवृत्ती चव्हाण,नगराध्यक्ष नितीन अडसूळ, पाणी पुरवठा सभापती योगेश मते,नगरसेविका प्रियांका औटी, वैशाली औटी, जयश्री औटी, नेहा औटी, अर्जुन भालेकर, बाळासाहेब कावरे, सुभाष शिंदे, डॉ.सचिन औटी, नगरसेवक भूषण शेलार, अजय औटी, गणेश औटी, शंकर गोरे, सुप्रिया शिंदे, मारुती ठोंबरे, संतोष अंबुले वआदीसह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
   पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाळ्यात ५० लाख रोप लावण्यात येणार आहे. मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड केल्यास कमी जागेत जास्तीच जास्त झाडांची लागवड होते. या पद्धतीचा वापर करून १० मीटर बाय १० मीटर जागेमध्ये ३०० झाडांची लागवड करता येऊ शकते. त्यात उंच, मध्यम व कमी उंचीचे विविध प्रकारचे वृक्ष, वेली व फुलझाडे असतात. या प्रकारे वृक्षांची लागवड केल्यास झाडांची कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. वृक्षांची लागवड केल्याने वृक्षांची जतन आणि संवर्धन केल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *