टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर, जि. अहमदनगर): अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या दोन ज्येष्ठ शिक्षकांचा सेवापूर्ती गौरव समारंभ बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.
विद्यालयाचे सन्माननीय सेवक मा. प्रा. विजय दत्तात्रय सोबले व मा. श्री. मल्हारी केरु वाघस्कर (सर) हे ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या दीर्घकाळीन समर्पित सेवेचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थेच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या खजिनदार मा. अॅड. दिपलक्ष्मी संभाजीराव म्हसे मॅडम यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. विवेक प्रभाकर भापकर साहेब उपस्थित होते. सन्माननीय उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव विश्वासराव आठरे पाटील,  मा. सिताराम विठ्ठलराव खिलारी साहेब,   गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. भाऊसाहेब सिताराम खिलारी साहेब, सहसचिव मा. मुकेश माधवराव मुळे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खिलारी, बाबासाहेब खिलारी,शिवाजी खिलारी,विलास झावरे,उपसरपंच किरण तराळ , दत्तात्रय निवडुंडे,पत्रकार शरद झावरे,मोहन रोकडे,यांच्यासह सर्व कार्यकारीणी व जनरल बॉडी सदस्य परिसरातील ग्रामस्थ,आजी/माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

  सोनल रोहोकले,अतुल सैद,बाबासाहेब जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्वागतोत्सुक म्हणून पर्यवेक्षक श्रीमती मनिषा आबासाहेब गाडगे व शास्त्र समन्वयक मा. अशोक दशरथ गांगड यांनी अतिथींचे स्वागत केले. शिक्षिका प्रतिनिधी श्रीमती खिलारी निलम दगडु व शिक्षक प्रतिनिधी श्री. जाधव बाबासाहेब बाळासाहेब यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सेवकवृंद, सर्व विद्यार्थी, श्री ढोकेश्वर वस्तीगृहाचे अधिक्षक व सेवकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक, पत्रकार व टाकळी ढोकेश्वर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. विजय दत्तात्रय सोबले व श्री. मल्हारी केरु वाघस्कर सर यांनी विद्यालयात अनेक वर्षे शिकवणूक, शैक्षणिक विकास व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या सेवेमुळे असंख्य विद्यार्थ्यांना चांगले संस्कार झाले. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करून संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (स्थापना १९१८) हा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर संस्था आहे. संस्था जिल्हाभरात माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये चालवते आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देते.

कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षकांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवेची आठवण सांगितली आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्वांनी एकत्रितपणे सेवानिवृत्त शिक्षकांना निरोप देताना भावनिक क्षण अनुभवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *