टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेसाठी दिलासादायक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 टाकळी ढोकेश्वर येथील साई सावली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विविध शासकीय आरोग्य योजना व हिमोफोलिया ट्रीटमेंट सेंटरचा लोकार्पण सोहळा ना. राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते.यावेळी बोलताना विखे पा.यांनी साईसावली हॉस्पिटलच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर सारख्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री जनआरोग्य विम्यामुळे गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा तसेच हिमोफोलिया ट्रीटमेंट सेंटरच्या माध्यमातून हिमोफोलिया रुग्णांसाठी औषधउपचार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. साई सावली हॉस्पिटल सर्वसामान्यांना भविष्यकाळात निश्चितच आधार ठरेल असे त्यांनी सांगितले.




यावेळी आ.काशिनाथ दाते यांनी मुख्यमंत्री गरीब सहायता निधी योजनेतुन तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना मोठया प्रमाणात फायदा मिळवून दिला असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक व स्वागत डॉ.भाऊसाहेब खिलारी यांनी केले.यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी,डॉ.भाऊसाहेब खिलारी,डॉ.स्वाती खिलारी,ऍड.रघुनाथ खिलारी,शिवाजीराव खिलारी,डॉ. बाळासाहेब बांडे,विनायक देशमुख,विश्वनाथ कोरडे, वसंतराव चेडे,राहुल पाटील शिंदे,बबनराव पायमोडे,
डॉ.विजय पुरी,डॉ.जयवंत निमसे,डॉ.तुषार धुमाळ,डॉ संतोष ढवळे,डॉ.अनिकेत भालसिंग,डॉ प्रदीप दाते, दादा भालेकर, प्रशांत गायकवाड,सुभाष दुधाडे, विलासराव झावरे,बापूसाहेब रांधवन,दत्ता आवारी,डॉ दत्ता दातीर व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.प्रा.भाऊसाहेब हिंगडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजीराव खिलारी यांनी आभार मानले.


🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील –
ना.राधाकृष्ण विखे पा.

पारनेर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाणीप्रश्नावर बोलताना ना.विखे पाटील म्हणाले की, पारनेर तालुक्यातील पठार भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी तालुक्यातील विविध पाणी योजनांचे सर्वेक्षण सुरु आहेत. मांडओहोळ धरण योजनेत गोदावरी खोऱ्यातून मिळणारे अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेच्या विकासासाठी ना.विखे यांचे मोलाचे 
सहकार्य – आ.काशिनाथ दाते….

पारनेर तालुक्यातील विकासकामांसाठी ना. विखे यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य असून तालुक्याच्या दळणवळनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा वाडेगव्हाण फाटा ते चंदनापुरी घाट रस्ता कामास मंजुरी व धोत्रे येथे २२८ के.व्ही सबस्टेशन मंजुरीसाठी ना.विखे यांनी सहकार्य करावे अशी मागणी आ. दाते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *