टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वंदे मातरम चलचित्र रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “वंदे मातरम हे मातृभूमीवरील प्रेम तसेच देशभक्तीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य आंदोलनात या गीताने सामान्य भारतीयांमध्ये जाज्वल्य देशभक्तीची ज्योत पेटविण्याचे कार्य केले. अनेक स्वातंत्र्यसैनिक या गीताने प्रेरित होऊन देशकार्य करत होते.”

वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना या गीताचे तसेच स्वातंत्र्य आंदोलनाचे महत्त्व समजावे यासाठी चलचित्र रथ फिरविण्यात येत आहे. हा विद्यापीठाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जिजाभाऊ घुले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी केले, तर आभार प्रा. नामदेव वाल्हेकर यांनी मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विरेंद्र धनशेट्टी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन प्रमुख श्री. सावकार काकडे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *