पारनेर | ता. प्रतिनिधी,
देविभोयरे येथील ग्रामदैवत अंबिका देवस्थान ट्रस्टला अखेर शासनाकडून ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला असून, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देवस्थानाच्या विकासासाठी नवे पर्व सुरू झाले आहे. यासाठी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून शासनाची मंजुरी मिळवून दिली. या यशाबद्दल देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि भाविकांनी आमदार दाते सर यांचा जाहीर सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
अंबिका देवस्थान हे देविभोयरेसह परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, अनेक वर्षांपासून या देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा, अशी ग्रामस्थांची सातत्यपूर्ण मागणी होती. हा दर्जा मिळाल्यामुळे देवस्थानाच्या प्रशासनात अधिक सुसूत्रता येणार असून, विकासकामांना गती मिळणार आहे. तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबरोबरच देवस्थानाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार काशिनाथ दाते सर यांनी वेळोवेळी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, प्रशासकीय प्रक्रिया आणि मंजुरीचा प्रत्येक टप्पा स्वतः लक्ष घालून पूर्ण केला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर शासनाने देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मंजूर केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, “देवस्थान ही केवळ पूजा-अर्चेची स्थळे नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याची केंद्रे आहेत. अंबिका देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, संपूर्ण देविभोयरे आणि परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान आहे. या देवस्थानाच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक निधी, सुविधा आणि पायाभूत विकासकामांसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हीच माझ्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
यावेळी देवस्थान अध्यक्ष शिवाजीराव जाधव, मा. उप सरपंच विकास सावंत, गणेश देवराम बेलोटे, , विश्वनाथ गाजरे, बाबुराव मुळे, गोपीचंद बेलोटे, विजय बेलोटे, सुभाष बेलोटे, संपत वाळुंज, संतोष बेलोटे, दत्तात्रय बेलोटे, बाबुराव बेलोटे, ज्ञानदेव बेलोटे, शहाजी बेलोटे, जगन बेलोटे, रामदास बेलोटे, विश्वनाथ बेलोटे, भाऊसाहेब बेलोटे, अजिंक्य बेलोटे, अक्षय बेलोटे, संतोष केदारी, राहुल केदारी, सुनील आरोटे, भाऊसाहेब सरडे, अमोल गजरे, शरद बोरुडे, सिताराम आरोटे, बबन बेलोटे, साहेबराव गुंड, हर्षद झावरे, दिनेश गायकवाड, अतुल मुळे, प्रमोद मोरे, संजय बेलोटे, नारायण माळी, संपत तिकोणे, संतोष सरडे, अरविंद बेलोटे, कमलाकर बेलोटे (मेजर), सत्यवान बेलोटे, दत्ता थोरात, सखाराम बेलोटे, रामकृष्ण दरेकर यांच्यासह देविभोयरे व परिसरातील भाविक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबिका देवस्थानाला मिळालेल्या ‘ब’ वर्ग दर्जामुळे देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या यशामागे आमदार काशिनाथ दाते सर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनहितासाठीची कटिबद्ध भूमिका निर्णायक ठरल्याचे सांगत ग्रामस्थांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत भविष्यातही आमदार दाते सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल, असा विश्वासही उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “अंबिका देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा ही आमच्या गावाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी होती. नवरात्रोत्सवाच्या काळात आमदार काशिनाथ दाते सर देविभोयरे येथे आले असताना आम्ही ही मागणी त्यांच्यासमोर मांडली. त्यावेळी सरांनी ‘हा विषय मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही,’ अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून अखेर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिला. या यशाचे सर्वाधिक श्रेय आमदार काशिनाथ दाते सर यांनाच जाते. तसेच या कामासाठी सहकार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा. नामदार जयकुमार गोरे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
– शिवाजीराव जाधव
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळणे हे देविभोयरे गावासाठी ऐतिहासिक यश आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आमदार काशिनाथ दाते सरांनी नवरात्रोत्सवात गाव भेटीदरम्यान आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण झाले, याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना आनंद आणि अभिमान आहे. आमदार दाते सरांनी दिलेला शब्द पाळल्यामुळेच हे यश शक्य झाले. या निर्णयासाठी पाठपुरावा करणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मा. नामदार जयकुमार गोरे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”
– विश्वनाथ गाजरे गुरूजी




