ना. विखे, आ. दाते यांचे नेतृत्वात विकासाकडे वाटचाल
पारनेर / ता. प्रतिनिधी,
नवनागापूर परिसरातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन विद्युत रोहित्र (DP) कामांचे उद्घाटन पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ निमित्त मुंबई येथे व्यस्त असल्याने त्यांच्या वतीने उद्योजक दिलीप दाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उद्योजक दाते यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांना शेती, माती आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असल्यामुळेच संपूर्ण मतदारसंघात सर्वसमावेशक विकासाचा समतोल साधणे शक्य होत आहे.
यावेळी अप्पासाहेब (बंडूनाना) सप्रे, संजय भोर, नरेश शेळके, संतोष रोकडे, दत्ताभाऊ चौरे, रामदास अडसूरे, अशोक रासकर, राजू शिंदे, राहुल सप्रे, रवींद्र सप्रे, शंकर पवार, सुयोग घोलप रमेश शेवाळे,संजय खाडे, किशोर खाडे, बाळासाहेब खरमाळे,साबळे साईनाथ, विकास लोखंडे, बबनराव गुडगळ,विपुल भोसले, नीलकंठ उल्हारे, नितीन खंडारे,निखिल शिंदे, प्रतिक कवडे, ऋषिकेश वाघ,गरकळ मामा,रावसाहेब वैरागर, गणेश नाईकनवरे, राजू चोरगे, लहू कुचेकर, विजय आवारे, अप्पासाहेब शिदोरे, किरण वीर, रामदास पालवे, अनिल साबळे, विलास घुले, प्रविण सुपेकर, आकाश कोल्हाळ, आकाश पवार,पोटोळे भाऊ, अंकूश थिटे, नाना खराडे, उमेश साळवे, नानासाहेब भणगे, तुषार गायकवाड,वैभव गायकवाड, प्रतीक म्हसे, अन्वर शेख, रमेश पालवे, नवनाथ घोरपडे, रविराज चौगुले, नितीन धोंडगे, कैलास लेंडाळ, सुजित वैद्य, मगर मामा, श्रीकांत खाडे, भाऊ पाळंदे, विकास शिंदे, श्रीकांत पवार, शरद गाढे, बाबासाहेब साठे, संजय कुलकर्णी, चंद्रकांत मुस्कवाड, बाबासाहेब साबळे, रोहित माने, संकेत ताडगडकर, रामदास जाधव, ओंकार साबळे, तेजस मिसाळ, आशिष साळवे, प्रदोष सांगळे ,महादेव पठारे, अनिल गिरी, मंथन राऊत, बाबासाहेब शिंदे,अशोक पुंड, अनिल पंडीत, राजूभाऊ क्षीरसागर, तापकीरे मामा, नितीन पवार, सुरेश पवार, गोकुळ म्हसे, गणेश चव्हाण, पांडे भैय्या, वीर माजी सैनिक संघटना सर्व पदाधिकारी, विशाल क्षीरसागर,भारत मनतोडें, चंद्रकांत मावळकर, प्रविण सुरानकर, सोमनाथ आढाव,संदिप जमदाडे, पोपट गायकवाड, अमोल सीतापुरे, सुरेश मुळे, शैलेश माघाडे, आनंद जाधव, संजय अंकुश, रतन गिते, देविदास शिंदे, सचिन बडे, जालिंदर खाडे, नंदकुमार भालेकर, राजन कोल्हे,भारत कोरडे, रमेश डुचे, दत्तात्रय झिने, बाबासाहेब निक्रड, विनायक नांगरे, शुभम घाडगे, शिवाजी खोसे,सरडे मेजर, तात्यासाहेब रूपनवर, अप्पासाहेब खोसे,जयंत थोरात, महेश कव्हाळे, कैलास म्हस्के, बन्शी काळे, लॅक्सिमीलाल शर्मा, रेणुकाताई पुंड,सोनालीताई चौरे,पवार ताई,कुलकर्णी ताई, आर्या भाभी, सुरंगे ताई, पुष्पा एकशिंगे, उषा दुधाडे, अंजली मंचरे, वैशाली मावळकर, मयुरी डागवाले, शुभांगी सोनार, सुरेखा पवार, वाबळे ताई, भालेराव ताई, आढाव ताई,सपना रासकर, शिंदे ताई, आशा सांगळे,सय्यद भाभी, गिते ताई,बाचकर ताई, सुमन कोल्हाळ, वैशाली नांगरे, जयश्री बडे, हेमा साळुंखे, जयश्री डुचे, रंजना निक्रड, कदम ताई आदी मान्यवर व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे दाते म्हणाले, मा. युवा खासदार सुजय विखे पाटील यांना संपूर्ण मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची अचूक जाण आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रश्न आणि गरजा यांची त्यांना सखोल माहिती असल्यामुळे विकासकामांना योग्य दिशा मिळत असून नवनागापूर परिसरातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन विद्युत रोहित्रांचे आज होत असलेले लोकार्पण हा या सर्व नेतृत्वांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाच्या फालश्रुतीचाच एक भाग आहे.
मोहिनीनगर येथील श्री हनुमान चौक, छत्रपतीनगर दांगट मळा येथील श्री शनिमंदिर परिसर, वकर्तुंड कॉलनी पाणी टाकी जवळ, आंधळे-चौरेनगर साईविश्व कॉलनी येथील साईबाबा मंदिर परिसर तसेच मनोरमा कॉलनी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्रांमुळे परिसरातील वीज पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे सांगत या नवीन विद्युत रोहित्रांमुळे यापुढे नागरिकांना अखंडित आणि उच्च दर्जाचा वीजपुरवठा मिळणार असून यामुळे व्होल्टेज कमी-जास्त होण्याची समस्या दूर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
🔶🔶🔶🔶🔶🔶
पालकमंत्री व आमदारांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकासाचा समतोल साधने शक्य आहे, नवनागापूर येथे विकास कामे करण्यासाठी बाकी कार्यकर्त्यांन प्रमाणे बंडु नानांचा आग्रह खुप असतो.
– उद्योजक दिलीप दाते




