माजी नगराध्यक्ष विजय औटी व माजी नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या पुढाकारातून पारनेरमध्ये विशेष कार्यक्रम

पारनेर / प्रतिनिधी :

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व शूर स्वातंत्र्यसेनानी सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारनेर शहरात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘मी ज्योतिराव फुले बोलतोय..!’ या एकपात्री नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार असून, या माध्यमातून महात्मा फुले यांचे विचार आणि सामाजिक कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पारनेर शहरातील लाल चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. लेखक व सादरकर्ते कुमार आहेर सर हे एकपात्री नाटक सादर करणार आहेत. महात्मा फुले यांनी शिक्षण, स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा विचार या नाट्यप्रयोगातून मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व माजी खासदार सुजय विखे पाटील व पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि माजी नगरसेवक नंदकुमार औटी यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर रात्री ८ वाजल्यापासून उपस्थितांसाठी स्नेहभोजन व दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमातून केवळ पुण्यतिथी साजरी करणे हा उद्देश नसून महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे विजय औटी यांनी सांगितले.तरी नागरिकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहून या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version