अहिल्यानगर I प्रतिनिधी,
जिल्हा सहकारी बॅंकेवर विशिष्ठ भागातील मोजक्या लोकांचा ताबा आहे. बॅंक शेतकऱ्यांची आहे असे सांगतात आणि बॅंकेच्या पैशाचा ठरावीक १२ कारखानदार वापर करतात. या कारखानदारांनी सर्व नियम मोडून ३ हजार कोटीचे कर्ज घेतले आणि ते थकवले आहे. जिल्हा बॅंकेचा फक्त उत्तरेसाठी वापर होतोय. सर्वच बाबतीत दक्षिण भागाचा केवळ वापर केला जात आहे असा आरोप खासदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप ढाकणे, शिवसेना नेते अॅड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांनी केला. थकवलेल्या नियमबाह्य कर्जाची वसुली करा आणि मग जिल्हा बॅंकेचे विभाजन करा, त्याशिवाय दक्षिणेतील सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी मागणीही यावेळी अॅड. शिवाजीराव काकडे यांनी केली.
जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीनंतर बुधवार दि. ४ रोजी खासदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप ढाकणे, शिवसेना नेते अॅड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जिल्हा सहकारी बॅंकेत मी एकदा संचालक म्हणून आमच्यातून निवडून आलो असलो तरी सगळ्यांना पुरुन उरेल असे सांगत नीलेश लंके व प्रताप ढाकणे यांनी निशाना साधला. ते म्हणाले, आम्ही कोणतेही नियमबाह्य काम बॅंकेत होऊ देणार नाही. १२ साखर कारखानदारांनी नियमाची मोडतोड करुन २८५० कोटीचे कर्ज घेतले आहे. राहुरी कारखाना चालवायला घेतल्यावर हातउसणे पैसे घेतात तसे जिल्हा बॅंकेतुन ३०० कोटी रुपये घेतले. बॅंक शेतकऱ्याची आहे म्हणता आणि कारखानदारांना पोसण्यासाठी वाट्टेल त्या बाबी करुन सगेसोयरे बॅंकेत आनता. बॅंकेची निवडणूक यांना बिनविरोध करायचीच नव्हती, दुष्काळाचे निमित्त सागून बिनविरोधचा एक ड्रामा होता. बिनविरोध करायला आमचा विरोध नव्हता. मात्र समिती करुन एकनाथ शिंदे यांच्या वतीने दोन व राष्ट्वादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे कोणतेही दोन उमेदवार घ्या अशी आमची मागणी होती. मात्र त्यांना मुळात हे करायचेच नव्हते. आम्ही रिंगणात उतरवलो म्हणून तरी वीस वर्षानंतर जिल्ह्यातील लोकांना निवडणूक कळली. अनेकांनी तसे बोलून दाखवले आहे. चिड व्यक्त करायला लोकांना संधी मिळाली. खरे तर घेतलेल्या कर्जाचे पाप झाकण्यासाठीच दुसऱ्या कोणाला बॅंकेत येऊ द्यायचे नव्हते.
जिल्हा बॅंकेतील चुकीच्या कामाला विरोधच कऱणार आहे. नियमबाह्य घेतलेले कर्ज वसुल करावे अशी आमची मुळ मागणी आहे. जिल्हा बॅंकेतील बोगस नोकर भरतीची फाईल कुठे आहे याचा शोध घेऊन कारवाईची मागणी करणार आहे. लंके बॅंकेत गेल्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. लंके खासदार झाल्यापासून अजूनही काहींना झोपा येईनात असा टोला यावेळी प्रताप ढाकणे यांनी मारला.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
तर चित्र वेगळे असते
खासदार निलेश लंके म्हणाले, जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणूकीत प्रचंड पैशाचा वापर करण्यात आला. मतदारांवर दबाव टाकण्यात आला. धमक्या देण्यात आल्या. मतदारावर मतदान करताना पाळत ठेवण्यात आली. प्रशासनाचाही वापर केला. शिवाय उत्तरेत सर्वाधिक मतदान आहे. तेच ते लोक बॅंकेत राजकारण करुन शेतकऱ्यांची बॅंक म्हणतात, पण आपल्या कारखान्यासाठी वापर करतात. अनेक मतदारांना दबावापोटी इच्छा असूनही आम्हाला मतदान करता आले नाही, जर मतदारांना मोकळ्या मताने मतदान करु दिले असते तर निकालाचे चित्र वेगळे असते.
🔶🔶🔶🔶🔶🔶
जिल्हा बॅंकेचे विभाजन करा….
अॅड. शिवाजीराव काकडे म्हणाले, जिल्हा सहकारी बॅंकेला ठरावीक कारखानदार मक्तेदारी समजून सत्ता मिळण्यासाठी सोयरेधायरे व सर्वच बाबीचा वापर करतात. यंदा आम्ही विस्थापीत लोकांसाठी निवडणूक लढवली. संगमनेर, कोपरगावात सर्वाधिक मते होती. आम्हाला तेथे कसलाही आधार नव्हता. दाबदडपशाही केली तराही आम्हाला एकून मताच्या ४५ टक्के मते मिळाली. निवडणूका लढवायला, मैदान म्हणून दक्षिणेचा वापर करतात. पण जेव्हा निधी द्यायची वेळ येते तेव्हा बॅंक असो की अन्य बाब सगळे पैसे उत्तरेत नेतात. विस्थापीत, सामान्य लोकांनी बॅंकेत येऊ नये म्हणून हे लोक प्रयत्नशील असतात. जिल्हा बॅंकेत दक्षिणेला कधी न्याय मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे विभाजन केले पाहिजे अशी आमची मागणी आहे.
