प्रतिनिधी/ शिरीष शेलार 
इंदापूर, पुणे (२९ जून २०२५): जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचे शिष्य सद्गुरु निष्ठ निळोबाराय यांच्या पादुकांच्या भेटीचा भक्तिमय सोहळा रविवारी दुपारी २:३० वाजता इंदापूर (जि. पुणे) येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात “एकोबा, तुकोबा, निळोबा” या नामघोषाने परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.

या प्रसंगी तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे आणि निळोबारायांचे वंशज ह.भ.प. गोपाळ महाराज मकाशीर यांनी पादुकांची भेट घडवून आणली. लाखो भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या. “येवूनी कृपावंती तुकया स्वामी सद्गुरु नाथे, हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी” या निळोबारायांच्या अभंगातील ओळींनी गुरु-शिष्याच्या भक्तिमय नात्याची उजळणी झाली.

इंदापूर येथील तुकाराम महाराज पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष खुशाल महाराज कोकाटे, उपाध्यक्ष मिनिनाथ कुंभार, उपसचिव महादेव चव्हाण आणि हरी दास सामसे यांनी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले. निळोबाराय संस्थान अध्यक्ष अशोक सावंत, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गोपाळ महाराज मकाशीर, सेवा मंडळ अध्यक्ष बबन अण्णा गाजरे, सचिव लक्ष्मण खामकर, चांगदेव शिर्के, संपत गाजरे, पाटील विणेकरी पांडुरंग रासकर, अनिल पोटे आणि पालखी सोहळा प्रसिद्धी प्रमुख शिरीष शेलार (जवळे) यांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आणि इंदापूर परिसर भक्तीच्या लाटेत न्हाऊन निघाला. (छायाचित्र: शिरीष शेलार, जवळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version