पारनेर / प्रतिनिधी, 
अहिल्यानगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पाणीदार माणूस विश्वनाथदादा कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट सरपंच बाळासाहेब रेपाळे मित्र परिवार तथा संकल्प युवा मंच, पुणेवाडी यांच्या वतीने आयोजित ‘संकल्प चषक कबड्डी प्रिमियर लीग-२०२६’ (९ वे वर्ष) ही रोमांचक कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. पुणेवाडी येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात ८ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली.   

या राज्यस्तरीय स्पर्धेत पंचक्रोशीतील आणि विविध ठिकाणांहून आलेल्या मातब्बर संघांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंनी आपल्या अफाट चपळाई, पकड आणि चिवट चढायांच्या बळावर उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी दररोज संध्याकाळी ७ वाजल्यापासूनच मैदानावर हजारो क्रीडाप्रेमींची गर्दी जमली होती. रोमांचक झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघांना आयोजकांकडून मानचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
* प्रथम क्रमांक: ३१,०००/- रुपये (प्रायोजक: मा. श्री. विश्वनाथ दादा कोरडे, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य, भाजपा).   

* द्वितीय क्रमांक: २५,०००/- रुपये (प्रायोजक: बंड्या ग्रुप पिंपळवंडी व श्री. उत्तमशेठ गाडगे, सरपंच, विरोली).   

* तृतीय क्रमांक: १५,०००/- रुपये (प्रायोजक: श्री. सचिनदादा बोरुडे, युवा उद्योजक).   

या स्पर्धेला मा.जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप राज्य परिषद सदस्य श्री.विश्वनाथ दादा कोरडे, गोरक्ष शेठ पुजारी, निवृत्त पीएसआय पाराजी रेपाळे साहेब, नगरसेवक युवराज पठारे, मा.सरपंच भास्कर पोटे, रवींद्र पुजारी,मोहन महाराज रेपाळे, पै.अक्षय कावरे, संभाजी औटी सर ई. यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
     
     स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी डॉ. योगेश रेपाळे (DMLT) यांनी प्रथमोचाराची धुरा सांभाळली, तर श्री. सुनिल शेळके (हत्तलखिंडी) यांनी आपल्या दर्जेदार डी.जे. व लाईट सिस्टीमच्या माध्यमातून संपूर्ण मैदानात एकच क्रीडामय आणि उत्साही वातावरण निर्माण केले.   

     स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री. दिपकशेठ रेपाळे, विश्वास रेपाळे, संतोष पोटे,अक्षय दुश्मन, पप्पू चेडे,अमोल रेपाळे,योगेश रेपाळे,आदित्य रेपाळे,संतोष गाडेकर,गणेश रेपाळे,सुरेश बोरुडे,तुषार बोरुडे,राजू बोरुडे यांसह अनेकांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे समालोचन संदीप रेपाळे सर आणि ऋषी औटी यांनी केले.

* प्रथम पारितोषिक खंडेश्वर फायटर्स पुणेवाडी 
* द्वितीय पारितोषिक रायडर्स पुणेवाडी 
* तृतीय पारितोषिक वॉरियर्स निघोज
    या भव्य कबड्डी स्पर्धेने पारनेर तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळकटी दिली असून, तरुणांमध्ये खेळाविषयीचा उत्साह द्विगुणित केला आहे.

`मा.श्री.विश्वनाथ दादांचे आम्हाला कायमच सहकार्य लाभते. याही वर्षी दादांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षक आणि स्पर्धकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचेही मनापासून आभार – श्री.बाळासाहेब रेपाळे (मा.सरपंच, पुणेवाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version