प्रती पंढरपूर पळशीच्या पवित्र विठ्ठल मंदिरात गीताचे झाले चित्रीकरण

टाकळी ढोकेश्वर I विशेष प्रतिनिधी, 
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘अबीर’ या चित्रपटातील भक्तिरसाने ओथंबलेले ‘देवा पांडुरंगा विठ्ठला’ हे गीत नुकतेच प्रदर्शित झाले असून, अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. विठुरायाच्या भक्तीचा गहिरा भाव व्यक्त करणारे हे गीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेत आले आहे.

या गीताला प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांनी आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाची साथ दिली आहे. गीतातील भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ श्रोत्यांना अनुभवायला मिळत असून, संगीतकार रोहित नागभिडे यांनी दिलेले सुरेल संगीत आणि गीतकार वैभव देशमुख यांनी रचलेले अर्थपूर्ण शब्द यामुळे गीत अधिक प्रभावी बनले आहे.

‘अबीर’ चित्रपटातील इतर गीतांना वैशाली माडे आणि राधा खुडे यांनीही स्वर दिले आहेत. शंभो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश विष्णू शिंदे यांनी केले असून, निर्मिती सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी केली आहे.


चित्रपटाचे चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील वासुंदे, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर, पळशी आणि पारनेर परिसरासह कोकणातील कुडाळ व वेंगुर्ला येथे करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन, निसर्गसौंदर्य आणि सामाजिक वास्तव यांचा संगम चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटात पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, गणेश देशमुख आणि यश डिंबळे यांच्या प्रमुख भूमिका असून, साईराज केंद्रे, प्राजक्ता हनमघर, अविनाश नारकर, प्रशांत शिंदे, प्रशांत नेटके पाटील, गणेश देशमुख, राणी कासलीवाल आणि रेखा दहातोंडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित वसंतराव झावरे पाटील यांची विशेष भूमिकाही चित्रपटाचे आकर्षण ठरणार आहे. तसेच सुजितराव झावरे पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन निशांत भागवत यांनी केले असून, संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता (प्रसिद्धी व वितरण) म्हणून मंगेश भीमराज जोंधळे कार्यरत आहेत.

‘देवा पांडुरंगा विठ्ठला’ हे ‘अबीर’ चित्रपटातील पहिले गीत असून, त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. हे गीत सर्व प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, विठ्ठल भक्तांसह संगीतप्रेमींनी या भक्तिमय गीताचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चित्रपटाच्या टीमतर्फे करण्यात आले आहे.

सामाजिक आशय आणि भावनिक कथानकावर आधारित ‘अबीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तो प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
‘अबीर’ चित्रपटात सुजित झावरे पाटील झळकणार…

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित वसंतराव झावरे पाटील हे आगामी ‘अबीर’ चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चित्रित झालेल्या या चित्रपटातून ते प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकणार असून, त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक कलाकारांना आणि ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या सहभागामुळे चित्रपटाला स्थानिक पातळीवर विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.

गाणे पाहण्यासाठी …
https://youtu.be/C_FSDsdihOs?si=7kqJmvrXENkI9od4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version