टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी
टाकळी ढोकेश्वर येथे सागर टकले यांच्या ‘शिवश्री अँग्रो एजन्सी’चा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. नवीन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्राशी संबंधित विविध सेवा व साहित्य उपलब्ध होणार असून, या व्यवसायामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठी सुविधा मिळणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सागर टकले यांचे अभिनंदन करून नवीन व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उज्वला दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बबनराव गायखे सर, खामकर सर, ठुबे सर, भाऊसाहेब टकले, नितीन टकले, गजानन टकले, रावसाहेब टकले, अंकुश टकले, शरद कजबे, नितीन शिंदे, सचिन पठारे यांच्यासह परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
नवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी सागर टकले यांचे कौतुक करत, ‘शिवश्री अँग्रो एजन्सी’ने शेतकरी व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत व्यवसायात उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी नवी वाटचाल सुरू करणाऱ्या ‘शिवश्री अँग्रो एजन्सी’ला परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
“सागर टकले यांनी सुरू केलेल्या शिवश्री अँग्रो एजन्सीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना चांगल्या सेवा मिळाव्यात आणि त्यांच्या नवीन व्यवसायाची यशस्वी वाटचाल व्हावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”
– रविंद्रशेठ राजदेव,
उपाध्यक्ष, निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर तालुका.
नेते, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट.




