खासदार निलेश लंके यांची राहणार प्रमुख उपस्थिती.
नांदूर पठार | प्रतिनिधी,
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील माता-भगिनींसाठी विशेष आणि संस्मरणीय करण्याच्या उद्देशाने सौ. सोनियाताई रविंद्रशेठ राजदेव यांच्या पुढाकारातून भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा विशेष सोहळा शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नांदूर पठार, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगर दक्षिणचे खासदार लोकनेते मा. श्री. निलेशजी लंके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमात हळदी-कुंकू समारंभ, राखी बांधणीचा सोहळा तसेच लाडक्या बहिणींना खास भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्नेह, आपुलकी आणि बंधुभावाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. रविंद्रशेठ राजदेव, टाकळी ढोकेश्वर गट नेते व उपाध्यक्ष, निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर तालुका आणि सौ. सोनियाताई रविंद्र राजदेव, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माता-भगिनींसाठी विशेष आकर्षण…..
हळदी-कुंकू • राखी बांधणी • खास भेटवस्तू • स्नेहमेळावा
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्याला टाकळी ढोकेश्वर गटातील माता-भगिनींची मोठी उपस्थिती राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
माता-भगिनींच्या सन्मानासाठी सदैव पुढाकार…
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त टाकळी ढोकेश्वर गटातील माता-भगिनींसाठी भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत माता-भगिनींच्या आनंदात सहभागी होण्याचा हा विशेष उपक्रम आहे.
– रविंद्रशेठ राजदेव,
टाकळी ढोकेश्वर गट नेते
उपाध्यक्ष, निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर तालुका




