पारनेर / प्रतिनिधी, 
पारनेर तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण साजरा करताना समाजातील गरजू, गरीब आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा हात द्या. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत माणुसकी जपत दिवाळी साजरी करा, असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना केले.

दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, यंदाच्या कठीण परिस्थितीत आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू कुटुंबांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेत, गरजूंना शक्य ती मदत करून आणि सामाजिक बांधिलकी जपत हा सण साजरा करूया, असा संदेश त्यांनी दिला.

पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, माता-भगिनी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करत खासदार निलेश लंके यांनी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version