धोत्रे येथे १५ लाखांच्या सभामंडपाचे लोकार्पण; दशक्रिया विधी घाटाच्या विकासासाठीही १५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन

पारनेर / प्रतिनिधी, 
 “मी काम करणारा माणूस आहे. पद असो अथवा नसो, विकासकामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिलो आहे आणि यापुढेही काम करतच राहणार आहे. धोत्रे गावाशी आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे नाते असून, गावानेही प्रत्येक अडचणीच्या काळात आमच्या कुटुंबाला प्रेम आणि साथ दिली आहे,” अशी ग्वाही सुजित झावरे पाटील यांनी धोत्रे येथे दिली.

पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी धोत्रे गावाशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा देत भविष्यातही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.


🔶🔶🔶🔶🔶
झावरे पाटील कुटुंबाचे धोत्रे गावाशी जुने ऋणानुबंध…

यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, धोत्रे गावात आजपर्यंत स्व.आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली. त्यांच्या विचारांचा आणि विकासकामांचा वारसा पुढे नेत असताना आपणही गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

“मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना धोत्रे गावासाठी प्रवेशद्वार, आरोग्य उपकेंद्र, पाणी योजना, सभामंडप, रस्ते, शाळेच्या खोल्या, दहनभूमी, बंधारे यासह अनेक विकासकामे मार्गी लावली. गावाच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत उपलब्ध माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी सांगितले.

धोत्रे गावानेही झावरे कुटुंबावर कायम विश्वास ठेवला असून, प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी ग्रामस्थांनी प्रेमाने आणि खंबीरपणे साथ दिली आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी काम करणे ही केवळ जबाबदारी नसून आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
दशक्रिया विधी घाटासाठी १५ लाखांचा निधी…

दरम्यान, धोत्रे येथील दशक्रिया विधी घाटाच्या विकासकामांसाठी १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन सुजित झावरे पाटील यांनी यावेळी दिले.

दशक्रिया विधी घाट परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नागरिकांना चांगल्या सोयी मिळाव्यात यासाठी विकासकामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावातील या महत्त्वाच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
“विकासाचा प्रवास असाच सुरू राहणार”….

गावातील विकासकामांचा उल्लेख करताना सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, विकास हा एखाद्या एका पदापुरता किंवा काळापुरता मर्यादित नसतो. गावातील नागरिकांच्या गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे.

“मी काम करणारा माणूस आहे आणि काम करतच राहणार आहे. धोत्रे गावाने माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर जे प्रेम केले आहे, त्याची जाणीव कायम आहे. गावाच्या विकासासाठी भविष्यातही जे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण….

सभामंडपाच्या लोकार्पणामुळे गावातील सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

लोकार्पण सोहळ्यास अरुणराव ठाणगे, अमोल साळवे, स्वप्नील राहीन्ज, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. सभामंडपानंतर आता दशक्रिया विधी घाटाच्या विकासासाठी १५ लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याने धोत्रे गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version