टाकळी ढोकेश्वर :
पारनेर तालुक्यातील आदर्शगाव टाकळी ढोकेश्वर येथे ईस्टर हा ख्रिस्ती बांधवांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
टाकळी ढोकेश्वर येथील न्यू अपोस्तोलिक चर्चमध्ये चर्च पास्टर विनोद गायकवाड व पास्टर दादासाहेब बागुल यांनी सर्वाना आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून संपूर्ण तमाम ख्रिस्ती बांधवांना वाईटावर विजय मिळवला जाऊ शकतो अनमोल असा प्रेमाचा संदेश दिला . यावेळी परिसरातील सर्व ख्रिस्ती बांधव याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सर्वत्र ख्रिस्ती बांधव आजच्या विजयी दिवसाचे विशेष पावित्र्य राखून प्रार्थना करतात
आज टाकळी ढोकेश्वर येथे सकाळी साडेदहा वाजता न्यू अपोस्तोलिक चर्चमध्ये पास्टर विनोद गायकवाड यांनी सर्वांना बायबलचे वाचन करून सर्वांना संदेश दिला व सर्वासाठी प्रार्थना केली .
चर्च सुटल्या नंतर या ठिकाणी सर्वासाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती
यावेळी , दादासाहेब बागुल,सुबोध गायकवाड, प्रमोद गायकवाड, नितीन कशीकेदार , महेंद्र बुट्टे, प्रकाश केदारी,श्याम अल्हाट , संदेश गायकवाड, कुणाल गायकवाड,विराज गायकवाड आदेश गायकवाड , रुनाल गायकवाड,स्वराज गायकवाड, योहान गायकवाड, लक्ष्मीबाई आल्हाट, शालुबाई गायकवाड,
संगीता अल्हाट,राणी गायकवाड,वैशाली गायकवाड, यांच्या सह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
