श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान; कार्यक्रमात महिलांचा मोठा प्रतिसाद
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा आणि कारेगाव परिसरातील श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था तसेच पांडुरंगाचे भक्त यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरपूर, पळशी येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला कारेगाव ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेत अन्नदानाचे आयोजन केले. मारग वस्ती येथे दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकरी भक्तांनी भजनात रंगून आनंद साजरा केला. यावेळी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांनी फुगडी खेळत भजनांचा आनंद लुटला.
हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपळगाव रोठा येथून प्रति पंढरपूर, पळशी येथे जाणाऱ्या या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. कारेगाव ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी कारेगावचे सरपंच बापूराव ठुबे, उपसरपंच अशोक पंडित, माजी उपसरपंच साहेबराव खरात, माजी सरपंच सावकार मुळे, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक घुले, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय घुले, मा. चेअरमन संपत ठुबे, ग्रामविकास अधिकारी कैलास राहींज, माजी उपसरपंच संदीप घुले, गंगाराम घुले, सुभाष खरात पोपट ठुबे, रोजगार सेवक प्रकाश ठुबे, युवा नेते राहुल घुले, आकाश ठुबे, अक्षय खरात, ज्ञानदेव मुळे, बबन मुळे, सखाराम खरात, दत्तात्रय राजदेव पोपट जगदाळे, संजय मुळे गोरख घुले पोपट खरात, बबन ठुबे ज्ञानेश्वर ठुबे खंडू घुले तुळशीराम घुले दादाभाऊ घुले शिवाजी गुंजाळ नवनाथ घुले जनार्दन राजदेव सबाजी घुले गणपत मुळे, वसंत खरात, मच्छिंद्र घुले, जालिंदर राजदेव, ज्योतीराम लाळगे, रोहित मुळे, रामदास घुले, लक्ष्मण खरात, अंकुश ठुबे, गणेश खरात, कार्तिक राजदेव, भिमाजी पंडित, नानाभाऊ जेडगुले, अजित घुले, शिवाजी घुले, विष्णू ठुबे, कृष्णा घुले, बाळासाहेब गुंजाळ, विमल घुले, दिपाली बोरुडे, अनिता घुले, सुवर्णा घुले, मनीषा ठुबे, उज्वला ठुबे, विद्या मुळे, कचराबाई ठुबे, समिंद्रा मुळे, सोनाली राजदेव आदी ग्रामस्थ महिला युवक तसेच श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे वारकरी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते.या दिंडी सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. वारकऱ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीत रंगून भजन, आणि रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. कारेगाव ग्रामस्थांनी दाखवलेल्या आतिथ्यशीलतेचे आणि अन्नदानाच्या सेवेचे सर्वांनी कौतुक केले. हा सोहळा परंपरेचा आणि भक्तीचा संगम ठरला.
