पारनेर / भगवान गायकवाड, 

कलागुणांची जोपासना हीच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असते, हे पिंपळनेर येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. येथील संत निळोबाराय विद्यालयाने सेनापती बापट राज्यस्तरीय करंडक नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या स्पर्धेसाठी विद्यालयाने ‘बेलवडीची गढी’ हे ऐतिहासिक नाटक सादर केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील देदिप्यमान इतिहास आणि स्त्री शक्तीचे दर्शन या नाटकातून घडवण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या कसदार अभिनयाने सर्वच भूमिका हुबेहूब साकारल्या, ज्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षक भारावून गेले.
नाटकातील विविध पात्रांना खालील विद्यार्थिनींनी न्याय दिला, छत्रपती शिवाजी महाराज: कु. ऋतुजा धांबोरे, सावित्री: संस्कृती जोगदंड, पंत: तेजस्विनी रासकर, हंबीरराव: श्रावणी लटांबळे,सयाजी काका: श्रावणी राजपूत, सखोजीराव: तनिष्का सिन्नरकर, नारायण: तृप्ती धांबोरे,मावळे: रेश्मा जाधव, अंजली कोकाटे, समृद्धी कांबळे, समीक्षा शिंदे, आर्या शेलार, कस्तुरी बोराडे आणि राधिका क्षीरसागर.


मार्गदर्शन आणि कौतुक….
या यशामागे विद्यालयातील कलाशिक्षिका सौ. वाळूंज कलाश्रुती तबाजी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनीच या नाटकाचे नाट्यकरण व दिग्दर्शन केले होते. “कला हे केवळ करमणुकीचे साधन नसून ती आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित करणारी शक्ती आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार रामराव सर यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन दिले. या यशाबद्दल ‘प्रयत्न शिक्षण संस्थेचे’ संस्थापक अध्यक्ष भास्कर रासकर (सर), सचिव सागर रासकर, तसेच गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.या पारितोषिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. सुरेश शिंदे, कॉलेजचे प्राचार्य आहेर सर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नाट्य स्पर्धेचे परीक्षण ज्ञानेश्वर कवडे, प्रतिभा फलके, मीरा पुजारी यांनी केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण पारनेर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version