आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा भव्य इंडक्शन प्रोग्राम

पारनेर/प्रतिनिधी : 
फार्मसी हा केवळ करिअर नव्हे तर मानवसेवेचे मोठे माध्यम आहे. यशस्वी फार्मासिस्ट होण्यासाठी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे नाही, तर आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य आणि सतत स्वतःला अपडेट ठेवण्याची मानसिकता आवश्यक आहे. तुम्ही आज ज्या आदर्श संस्थेत प्रवेश घेतला आहात, ती तुम्हाला केवळ पदवी नव्हे तर उत्तम व्यक्तिमत्व व नेतृत्वगुण देणार आहे असे मत प्रा. दिपाली कुरकुटे यांनी व्यक्त केले.

खडकवाडी (ता. पारनेर) येथील आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सअंतर्गत संचालित आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि. १० नोव्हेंबर रोजी प्रथम वर्ष व डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी उत्साहपूर्ण इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक ऍड. डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. दीपाली कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संवादकौशल्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. कृष्णकांत खणकर यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ढोकळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला आणि खडकवाडी परिसरात लवकरच जीएनएम नर्सिंग, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी, मेडिकल कॉलेज तसेच इतर अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. मोढवे यांनी तर आभारप्रदर्शन श्री. सरोदे यांनी केले. सचिन इले, सुरज डहाळे, अभिषेक शिंदे, महेश लोंढे, अमोल गागरे, सचिन जाधव, संजय टेकूडे यांच्यासह फार्मसी कॉलेज व आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

नवागत विद्यार्थी, पालक तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
खडकवाडी सारख्या ग्रामीण भागात आरोग्याचे शिक्षण देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी हा ग्लोबल जगात आरोग्य सारख्या मोठ्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावा हेच खडकवाडी येथील आदर्श शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यापुढील काळात आरोग्य विषयक शिक्षणामध्ये बळ देणार आहे. 
– डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे 
(अध्यक्ष, आदर्श शैक्षणिक संकुल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version