विशाल गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवाडीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पारनेर/प्रतिनिधी :
खडकवाडी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेली विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत या विद्यार्थ्यांना नेहमीच निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीची भावना असते विशाल गागरे यांनी खासदार निलेश लंके यांना आदर्श मानून वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत समाजामध्ये आदर्श घालून दिला आहे युवकांनी अनावश्यक खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवावेत त्या माध्यमातून समाज व्यवस्था उभी राहण्यास मदत होते. असे मत टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निलेश लंके युवक प्रतिष्ठानचे सचिव अमोल उगले यांनी व्यक्त केले. 


खासदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचारांना आदर्श मानून नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले युवा नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पदाधिकारी तथा निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थी संघटनेचे सचिव विशाल गागरे यांचा वाढदिवस खडकवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.


विशाल गागरे हे खडकवाडी व परिसरातील युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. ते निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देतात. वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आदी शालेय साहित्य वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
या कार्यक्रमाला टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे नेते अमोलभाऊ उगले, जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जालिंदर वाबळे, ह.भ.प. बाबा महाराज खामकर, संतोष शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय इघे, बाळासाहेब शिंगोटे सर, मुख्याध्यापक भाऊसाहेब ढोकळे, गणेश आग्रे, संपत मधे, आर्यन गागरे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री वाबळे, नीलम कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, खडकवाडी ग्रामस्थ आणि विशाल गागरे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होता.

कार्यक्रमात उपस्थितांनी विशाल गागरे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. अशा उपक्रमांमुळे युवा पिढीला प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *