पारनेर/प्रतिनिधि,

इतर मागास बहुजन कल्याण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्ह्यातील आश्रमशाळेतील काही सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि अधिक्षक यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील इयत्ता दहावी, बारावी परिक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक विनोद लोंढे हे होते. याप्रसंगी लेखाधिकारी शेलार, निरीक्षक तुकाराम कातकडे, मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर, रणधीर आहेर, संदीप महांडुळे, रमेश वाबळे, अर्जुन सोनवणे, संजय पालवे, मनोजकुमार सोनवणे, शाकीर शेख, राजाराम वाघ आदी उपस्थित होते. 

       अहिल्यानगर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी च्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्तांमध्ये मुख्याध्यापक जयंत आवटे, अशोक तुपे, चांगदेव काटकर, सौ उज्वला औटी, लक्ष्मण फलके, चंद्रभान मंचरे आदींचा गौरव करण्यात आला.
     यावेळी बोलताना सहाय्यक संचालक विनोद लोंढे म्हणाले की, आश्रमशाळा मुख्याध्यापक हे पद काटेरी मुकट असल्याने या ठिकाणी सेवा करताना खूप जबाबदारीने काम करावे लागते. आज सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापकांनी व अधीक्षकांनी ही जबाबदारी पार पाडली आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
  अहिल्यानगर जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये अनेक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. याचीच परिमिती म्हणजे आज गौरविण्यात आलेले दहावी व बारावीचे विद्यार्थी तसेच स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
– श्री विनोद लोंढे
सहाय्यक संचालक, अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version